20.9 C
New York

Toll Price Hike : नागरिकांचा हायवेवरील प्रवास महागला

Published:

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयच्या वतीनं घेण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळं आता खर्चात आणखी भर पडणार आहे. (Toll Price Hike) कारण, सोमवारपासून टोल दरवाढ लागू होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना आता प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा टोल दरवाढ (Loksabha Election 2024) लोकसभा निवडणूक संपताच लागू केल्यामुळं हा बदल पाहायला मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलपासून दरातील ही वाढ ही लागू होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली.

आता सर्व टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर NHAI ने टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाहनचालकांच्या खिशावरील ताण आणखी वाढणार आहे. तसेच सतत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे बजेटही यामुळे कोलमडण्याची शक्यता आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन दर 3 जून 2024 पासून लागू करण्यात येत आहेत. वार्षिक आर्थिक नियोजनाचा टोल फी वाढवणे हा भाग आहे. महागाई दरात होणाऱ्या बदलांवर यातील वाढ ही अवलंबून असते. पुढे बोलताना या अधिकाऱ्याने म्हटले की, देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर 855 टोल प्लाझा आहेत, यावर राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 नुसार वापरकर्ता शुल्क आकारले जाते.

 तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे लोकल विस्कळीत

Toll Price Hike टोल टॅक्स म्हणजे काय ?

टोल टॅक्स हे काही आंतरराज्यीय द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग ओलांडताना चालकांना भरावे लागणारे शुल्क असते. अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) अंतर्गत ते नॅशनल हायवे येतात. मात्र, दुचाकी वाहनचालकांना टोल भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

Toll Price Hike इंधनाचे दरही वाढणार?

देशभरातील इंधनाचे दर गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत. मात्र आता त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने इंधानाचे दर लोकसभा निवडणुकीमुळे वाढवले नसल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र आता निवडणुकीच्या निकालानंतर इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img