10.4 C
New York

BJP : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

Published:

मुंबई

भारतीय जनता पक्षाने (BJP) कोकण पदवीधर, कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार (BJP announced candidates) जाहीर केले आहेत. याठिकाणी कोकण विभाग पदवीधरसाठी निरंजन वाडखरे (Niranjan Davkhare), मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी किरण रविंद्र शेलार (Kiran Shelar) आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ हिरामन दराडे (Shivnath Darade) यांना उमेदवारी दिली आहे. भाजपे पत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी निवडणुकीची तारीख पुढे ढकलली होती. कोकण विधान परषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये मनसे, भाजप आणि शिंदेची शिवसेना समोरासमोर आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसे या सर्व पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्रित लढवली होती. मनसेने या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरिता बिनशरता पाठिंबा दिला होता. मनसेने या विधान परिषद निवडणुकीमध्ये सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केला होता. त्यामुळे मनसेला या निवडणुकीमध्ये पाठिंबा देणार अशी चर्चा होते मात्र नंतर सर्वच मित्र पक्षांनी देखील आपले उमेदवार जाहीर केल्या.

मनसेने कोकणातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार जाहीर करुन टाकला. शिवसेनेने संजय मोरे यांना उमेदवारी दिली. यामुळे कोकणात शिवसेना, भाजप आणि मनसे या महायुतीमधील तीन पक्षात लढत होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img