18.8 C
New York

Pen : जागतिक सायकल दिनानिमित्त पेणमध्ये सायकल रॅली

Published:

पेण

3 जून हा जागतिक सायकल दीन (World Bicycle Day) म्हणून ओळखला जातो. या सायकल दिनाचे औचित्य साधून पेण (Pen) मधील निसर्ग प्रेमी आणि लहान मुलांसह जेष्ठ नागरिक तसेच डॉक्टर, पत्रकार यांनी सहभाग घेऊन आज पेण शहरात सायकल रॅली काढून पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे आवाहन केले.

सध्याचे वातावरण पाहता वाढती उष्णता आणि झालेली वृक्षतोड तसेच नष्ट केलेले डोंगर या सर्व गोष्टी लक्षात घेता पर्यावरणाची हनी रोखणे ही काळाची गरज बनली आसल्याने आज पेण मधील निसर्ग प्रेमींनी सायकल रॅली काढून पर्यावरणाची हनी रोखण्यासाठी जास्तीत जास्त सायकलचा वापर करण्याचा संदेश दिला. सायकल चालवा प्रदूषण रोखा, सायकल चालवा इंधन वाचवा, सायकल चालवा ध्वनी – वायू प्रदूषण रोखा, सायकल चालवा शरीर तंदुरुस्त ठेवा अशा प्रकारच्या घोषणा देत या निसर्ग प्रेमींनी संपूर्ण पेण शहरातून सायकल रॅली काढली होती.

आम्ही काढलेली रॅली ही पर्यावरण पूरक रॅली असुन लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक या रॅली मधुन संदेश देत आहेत. सायकल चालविण्याने तब्बेत तंदुरुस्त राहते, प्रदूषण होत नाही, इंधन बचत होऊन पैसे देखील वाचतात म्हणूनच पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा संदेश देण्यासाठी आम्ही आज ही सायकल रॅली काढली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img