मध्य प्रदेशातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर (Road Accident) आली आहे. नदीत बोट उलटून झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच आणखी एक भीषण अपघात घडला आहे. राजगडमध्ये रविवारी रात्री वऱ्हाडी मंडळींना घेऊन चाललेला ट्रॅक्टर अचानक उलटला. या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. राजगढचे जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात तेरा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दोन जणांच्या छातीवर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत त्यामुळे त्यांना भोपाळला पाठवण्यात आले आहे.
आता या अपघातात आणखी मृत्यू होतील अशी शक्यता नाही. गंभीर जखमी असलेलेही आता धोक्यातून बाहेर आले आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थानातून आलेल्या एका लग्नाच्या वऱ्हाडातील होते. लग्नाचं वऱ्हाड राजस्थानातील मोतीपुरा येथून मध्य प्रदेशातील कमालपुरा येथे निघाले होते. ही घटना पिपलोदा जवळ छायन रोड परिसरात घडली. या ठिकाणी ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक उलटली. त्यामुळे ट्रॉलीखाली दबून तेरा लोकांचा मृत्यू झाला तसेच बरेच जण जखमी झाले. या घटनेची माहिती पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे लोकल विस्कळीत
ट्रॅक्टर अपघातग्रस्त होताच घटनास्थळी मोठी आरडाओरड झाली. वऱ्हाडी मंडळींचा आक्रोश ऐकून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांचे पथक येथे दाखल झाले. पोलीस आणि आरोग्य विभागाने मिळून बचावकार्याला सुरुवात केली. ट्रॉली नेमकी कशामुळे उलटली, यात ट्रॅक्टरचालकाची काही चूक आहे का याची अजून खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.