10.3 C
New York

Amul Milk Price : अमूल दूध महागले

Published:

महागाईमुळे सर्वसामान्यांची आधीच वाईट अवस्था झाली असताना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी समोर आली आहे. (Amul Milk Price) अमूलच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक निकालाची धामधूम सुरु असतानाच दुधाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. अमूल दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ जाहीर केल्याचं सांगितलं. प्रसिद्धीपत्रकाद्वारे दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती दिली. आजपासून अमूल दूध खरेदी दोन रुपयांनी महाग होणार आहे. अमूल गोल्ड 500 मिली लिटरमागे 2 रुपयांनी वाढून ३३ रुपये नवीन किमतींनुसार झालं आहे. सोमवारपासून या किंमती लागू होणार आहेत.GCMMF ने आज जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, एकूणच ऑपरेशन आणि दुधाचे उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Amul Milk Price एका लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?

मिळालेल्या माहितीनुसार, GCMMF ने रविवारी अधिकृतपणे नवीन किमती जाहीर केल्या आहेत. अमूल दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ केल्याने सर्वसामानांच्या खिशावर भार पडू शकतो. अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सोमवारपासून म्हणजेच ३ जून २०२४ पासून लागू होणार आहे. त्यामुळे अमूल गोल्डसाठी तुम्हाला ६६ रुपयांऐवजी ६८ रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल ताजाची किंमत 54 रुपये प्रति लिटर आणि शक्तीची किंमत ६० रुपये प्रति लिटर आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) म्हटले आहे की, अमूल दुधाच्या किंमती वाढल्या आहेत. कारण एकूण ऑपरेशन आणि उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे देशभरातील सर्व बाजारपेठांमध्ये अमूल दुधाच्या पाऊचच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये जीसीएमएमएफने दुधाच्या दरात वाढ केली होती. ‘अमूल’ ब्रँडअंतर्गत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करणाऱ्या जीसीएमएमएफचे एमडी जयेन मेहता म्हणाले की, वाढीव उत्पादन खर्चाची भरपाई करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक आहे.

नागरिकांचा हायवेवरील प्रवास महागला

Amul Milk Price एमआरपीमध्ये ३-४ टक्के वाढ

“प्रति लिटर दोन रुपयांची वाढ म्हणजे एमआरपीमध्ये ३-४ टक्के वाढ होते, जी सरासरी अन्नधान्य महागाईपेक्षा खूपच कमी आहे. फेब्रुवारी २०२३ पासून अमूलने प्रमुख बाजारपेठांमध्ये ताज्या पाऊच दुधाच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही, असे जीसीएमएमएफने म्हटले आहे.

Amul Milk Price दुधाच्या किंमती का वाढवण्यात आल्या?

दरवाढीबाबत GCMMFने सांगितले की, “दूध उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने दुधाच्या किंमत वाढवण्यात आल्या आहेत. तसेच वर्षभरात अमूलच्या दूध संघांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरामध्ये सहा ते आठ टक्क्यांनी वाढ केली आहे. अमूलच्या धोरणानुसार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी ग्राहकांनी मोजलेल्या एक रुपयापैकी जवळपास 80 पैसे दूध उत्पादकांना जातात. दरवाढीमुळे दूध उत्पादकांना दुधाचे दर टिकून राहण्यास मदत होईल आणि त्यांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल”.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img