‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून आपल्या कामासोबतच तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. अभिनेत्री अदा शर्मा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मुंबईतील घरात राहायला (Sushant Singh Flat) जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहे तिच्याशी संबंधित एक बातमी समोर येतेय ती म्हणजे की ती लवकरच दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मुंबईमधल्या घरी शिफ्ट होणार आहे. तिने स्वत:च याबाबत खुलासा केला आहे. वांद्रे येथे असणारे घर खरंतर सुशांतच्या निधनापासून त्याचे रिकामीच आहे. व सतत चर्चेतदेखील आहे. 2020 साली याच घरात त्याचा मृतदेह सापडला होता. त्याने आत्महत्या केली होती की त्याची हत्या झाली होती हे अद्याप कळू शकलेले नाही. याचा तपास अजूनही सुरू आहे. याचदरम्यान आता सुशांतचे घर पाच वर्षांसाठी अदा शर्माने भाड्याने घेतले आहे.
नागरिकांचा हायवेवरील प्रवास महागला
अदा शर्माने सुशांतचं हे घर 5 वर्षांसाठी भाड्याने घेतलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिने अॅग्रीमेंट केलं. १४ जून २०२० रोजी कोव्हिडच्या काळात सुशांतसिंह राजपूतने याच फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये प्रचंड उलथापालथ झाली होती. याविषयी अदा म्हणाली, “या फ्लॅटमध्ये मी चार महिन्यांपूर्वीच राहायला आले.पण माझ्या ‘बस्तर’चं शूटिंग आणि ‘द केरळ स्टोरी’चं ओटीटी प्रदर्शन प्रोजेक्ट्सचं प्रमोशन,या सर्व गोष्टींमध्ये मी व्यस्थ होते. यातून थोडा मोकळा वेळ मिळताच मी मथुरेतील हत्ती अभयारण्यात काही वेळ घालवला. अखेर स्वत:साठी थोडा वेळ काढल्यानंतर मी या नव्या घरात रुळली आहे, असं म्हणायला हरकत नाही.”
“मी वांद्रेमधील पाली हिल इथल्या माझ्या घरात लहानपणापासून राहिले आहे. ही माझी पहिलीच वेळ आहे दुसऱ्या घरात राहायला जाण्याची . मी प्रत्येक जागेतील ‘वाइब्स’च्या बाबतीत खूप संवेदनशील आहे आणि या जागेतून मला सकारात्मक वाइब्स मिळतात.केरळ आणि मुंबईतील माझ्या घराच्या आजूबाजूला बरीच झाडं आहेत. आमच्या घराजवळ विविध पक्षी आणि खारूताई यायची. असं अदाने सांगितलं. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या वांद्रे इथल्या या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. त्यामुळे त्याच्या निधनानंतर त्याच घरात राहण्याबद्दल अनेकजण साशंक होते. म्हणूनच बरीच वर्षे या घरात राहायला कोणी तयार होत नव्हतं. त्यामुळे अदा शर्माने हे घर भाडेतत्त्वावर घेतल्याचं कळताच त्याची जोरदार चर्चा झाली. अनेकांनी तिलासुद्धा या घरात राहण्यापासून रोखलं होतं. मात्र त्या कोणाचंही न ऐकता स्वत:चं मन काय म्हणतंय, त्यावरून निर्णय घेतल्याचं अदाने स्पष्ट केलं. अदाने पुढील पाच वर्षांसाठी हे घर भाडेतत्त्वावर घेतलं आहे.