9.1 C
New York

Loksabha Election : 64 कोटी नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

Published:

देशात 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीनंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली असून उद्या 4 जून रोजी निवडणुकीचा महानिकाल (Loksabha Result) जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीसंदर्भात माहिती दिलीयं. 18 व्या लोकसभेसाठी 64 कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये महिला मतदारांना निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

राजीव कुमार म्हणाले, देशभरात 18 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीसाठी देशातील एकूण 64 कोटी नागरिकांनी मतदान केलं असून त्यामध्ये 31.4 कोटी महिलांनी मतदानाचा हक्क बजावलायं. यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं असून त्यांना निवडणूक आयुक्तांकडून उभं राहुन मानवंदना देण्यात आलीयं. तर यंदा निवडणुकीत 64 कोटी नागरिकांनी मतदान केल्याने आपण मतदानाचा विक्रम मोडला असून हा विश्वविक्रम केला असल्याचं निवडणुक आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Loksabha Election राज्यात काँग्रेसला जोरदार झटका

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलंय. त्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोलही समोर आले आहेत. यामध्ये देशात एनडीए आघाडी हॅटट्रीक करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलायं. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वतील एनडीएने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. मात्र, इंडिया आघाडीनं कडवं आव्हान दिलं. परंतु, काही राज्यात काँग्रेसला जोरदार झटका बसताना दिसतंय, तर फक्त इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 400 पारचं टार्गेट पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Loksabha Election इंडिया आघाडीला 109 ते 139 जागांचा

या एक्झिट पोलनुसार एनडीएला 371 ते 400 जागा मिळतील तर विरोधी इंडिया आघाडीला 109 ते 139 जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला तामिळनाडूत 5 ते 7, केरळमध्ये 1 ते 3, कर्नाटकात 18 ते 22, तेलंगणात 8 ते 10, आंध्र प्रदेशात 4 ते 6 जागा मिळतील असा अंदाज आहे. या पोलमध्ये इंडिया आघाडीला 109 ते 139 जागांचा अंदाज दाखवण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेस 52 ते 64 जागांचा अंदाज आहे. या एक्झिट पोलमध्ये 28 ते 38 जागा अन्य पक्षांना 28 ते 38 जागा मिळतील असा अंदाज आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशात सात टप्प्यात मतदान घेण्यात आलं. भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडी पुन्हा चांगली कामगिरी करताना दिसत आहे तर विरोधी इंडिया आघाडीही जोरदार टक्कर देताना दिसत आहे. आता देशात एनडीए इंडिया आघाडीचं कडवं आव्हान पेलू शकणार का? हे उद्या 4 जूनला निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img