5.2 C
New York

Loksabha Election : नगर दक्षिणेत कोण जिंकणार?

Published:

आपल्या पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा आपल्या पक्षाकरिता काम (Loksabha Election) करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीसाठी पछाडलेली ही माणसं आहेत. थोरात यांनी थोडी तरी लाज बाळगली पाहिजे. आपण स्वतःला जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते स्वतःला समजता साधी एकही जागा आपण आपल्या जिल्ह्यात पक्षाला घेऊ शकले नाहीत. दुसऱ्याची तळी उचलण्यातच ते धन्यता मानतात अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना जोरदार शाब्दिक टोला लगावला. नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री विखे यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना विखे म्हणाले की निवडणुकीचा निकाल जवळ आला असून येणाऱ्या चार जूननंतर अनेकांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे अशा शब्दांत विखे यांनी शरद पवार यांच्यावर शाब्दिक तोफ डागली.

Loksabha Election महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका

देशात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मंगळवारी निकाल येणार आहेत. त्याआधी माध्यमांमध्ये एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार देशात इंडियाला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या कार्याची दखल घेत जनतेने हा त्यांना दिलेला पाठिंबा या माध्यमातून दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यात महायुतीला चांगले यश मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. एक्झिट पोल, राजकीय विश्लेषण असो यांचा हा केवळ एक अंदाज आहे. चार तारखेच्या मतमोजणीनंतर या सर्वांना उत्तर मिळेल असं देखील यावेळी मंत्री विखे म्हणाले.

लंकेंच्या ‘त्या’ आरोपांना विखेंचे सडेतोड उत्तर

Loksabha Election नगर दक्षिणेत कोण जिंकणार?

राज्यात चुरशीचा सामन्यांमध्ये नगर दक्षिणेची जागा देखील आहे. यावर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की नगर दक्षिणेची जागा महायुती जिंकणार असा विश्वास आम्हाला सुरुवातीपासूनच आहे. थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता. सोशल मीडियामधून लोकांमध्ये विष पेरणी केली गेली. मात्र शेवटी जनतेला हा कामावर विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद सुजय विखे यांना आहे. फडणवीस यांचे देखील मोठे सहकार्य असल्याने या सर्वांच्या जोरावर तीच आपण नगर दक्षिणेची जागा जिंकून येणार आहोत असा विश्वास यावेळी मंत्री विखे यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img