22.3 C
New York

Lok Sabha Election : महाराष्ट्राची कोणाला साथ एक्झिट पोलचा अंदाज काय?

Published:

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) राज्यातील 5 टप्प्यांसह देशातील 7 टप्प्यातील मतदान संपले असून आता एक्झिट पोल समोर यानंतर येण्यास सुरुवात झाली आहे. एझ्टिट पोलनुसार महाराष्ट्रात (Maharashtra Exit Poll) महाविकास आघाडीची (Mahavika Aaghadi) सरशी झाली आहे, मात्र असे असले तरी महाराष्ट्रात भाजपा (BJP) हा सर्वाधिक जागा जिंकणारा एक नंबरचा पक्ष आहे.

राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले असून त्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा होताना दिसत आहे. महाविकास आघाडीला राज्यातील 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज टिव्ही 9 मराठीच्या पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. टिव्ही 9 मराठीच्या पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतील सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने 21 जागा लढवल्या होत्या. 14 जागा त्यापैकी त्यांच्या निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. 10 जागा शरद पवार यांच्या पक्षाने लढवल्या होत्या. त्यापैकी त्यांच्या 6 जागा निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर राज्यात 17 जागा लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या 5 जागा जिंकून येतील असा अंदाज टिव्ही 9 मराठीच्या पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात ६० टक्के मतदान

Lok Sabha Election भाजपा एक नंबरचा पक्ष (BJP number one party)

महायुतीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 22 जागा मिळणार असल्याचा अंदाज टिव्ही 9 मराठीच्या पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपा हा राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा एक नंबरचा पक्ष आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 28 जागा भाजपाने लढवल्या होत्या,18 जागा त्यापैकी जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.. तर दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. शिवसेनेला 15 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 4 जागा जिंकून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 5 जागा लढवणाऱ्या अजित पवार गटाचा सुफडा साफ होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा अंदाज टिव्ही 9 मराठीच्या पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img