21 C
New York

Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र केली ‘ही’ मागणी

Published:

मुंबई

जगातील सर्वात मोठी आणि अनुकरणीय अशी लोकशाही अस्तित्वात असलेल्या आपल्या भारत देशात दिनांक १९ एप्रिल २०२४ पासुन सुरू झालेल्या मतदानाचे ७ टप्पे दिनांक ०१ जून २०२४ रोजी पूर्ण झाले आहेत. या मतदानाच्या टप्यादरम्यान सामान्य मतदार बंधू,भगीनींना, वरीष्ठ नागरीकांना व मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रचंड असुविधांचा सामना करावा लागला. त्यामुळे मतमोजणीसाठी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Eelection Commission) यांना पत्र लिहले आहे.

राज्यातील बहुतेक भागात उष्णतेची लाट होती व ४० ते ४७ डिग्री सेल्सीअस तापमानामध्ये रखरखत्या उन्हात नागरीकांना मतदानासाठी रांगा लावून तासनतास ताटकळत उभे राहावे लागले. निवडणूक आयोगातर्फे पिण्याच्या पाण्याची सोय तसेच निवा-यासाठी सावलीची व्यवस्था व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे नागरीकांकडून निवडणूक आयोगाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. काही राज्यांमध्ये मतदारांना व शासकीय कर्मचा-यांना उष्माघाताने आपले प्राण गमवावे लागले.

या लोकशाहीच्या महोत्सवाचा शेवटचा टप्पा म्हणजेच मतमोजणी दिनांक ०४ जून २०२४ रोजी होणार आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यात अद्याप उष्णतेची लाट कायम असून तापमान ४५ डिग्री सेल्सीअसच्या आसपास आहे. मतदानादरम्यान असुविधांचा कटू अनुभव जनतेने व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मतमोजणी प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग असणा-या व्यक्तींमध्ये उदासीनता व भितीचे वातावरण आहे. त्यामुळे दिनांक ०४ जून २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणा-यांना निवडणूक आयोगाने अंतर्भुत केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व सोयी सुविधा (पाणी, पंखे, कुलर, आरोग्य सुविधा इत्यादी) उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना आवश्यक निर्देश द्यावेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img