4.1 C
New York

Uddhav Thackeray : ठाकरे गटासंदर्भात शिंदे गटाच्या खळबळजनक दावा

Published:

मुंबई

शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजप (BJP) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) तणाव वाढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह भाजप नेत्यांवर सडकून टीका करत असतात. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून विजयाचा दावा केला जात आहे. त्यातच आता शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी (Deepak Kesarkar) उद्धव ठाकरे गटासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे.

दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरेंना एनडीएत यायचं आहे. यासाठी विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी मेसेज पाठवत आहेत असे केसकर म्हणाले. यानंतर केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवरही भाष्य केलं. महाराष्ट्रात निघालेले फतवे आणि उशिरा झालेल्या जागावाटपामुळे आम्हाला फटका बसला. आता आम्ही विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या निवडणुकीत आम्हाला अपेक्षित जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दीपक केसरकर म्हणाले, महाराष्ट्रमध्ये लोकसभा निवडणूक एकीकडे महायुती दुसरीकडे महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये विभागलेली होती. एकीकडे महायुतीमध्ये भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी असे पक्ष विभागले गेले होते. त्यामुळे 2014 किंवा 2019 यापेक्षा 2024 ची निवडणूक महाराष्ट्रासाठी वेगळी ठरली.

दीपक केसरकर म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात पडलेली पक्षातील फूट या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी ठरली. तसेच मराठा आरक्षणासाठीचा आंदोलन असो किंवा मराठा विरुद्ध ओबीसी या सर्व गोष्टींचा प्रभाव महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवलेली आहे. या सर्व प्रभाव पाडणाऱ्या गोष्टींचा फायदा नेमका कुणाला होणार? याचा प्राथमिक अंदाज या एक्झिट पोलच्या आकड्यांमधून समोर आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img