नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने चर्चेत असणारी अभिनेत्री रवीना टंडन ( Raveena Tandon ) यावेळी मात्र वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील बांद्रा या भागामध्ये रवीनाने एका लहान मुलीसह वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घालत त्यांना मारहाण केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून रवीनावर प्रचंड टीका केली जात आहे. तसेच ही घटना घडली त्यावेळी रवीना नशेमध्ये असल्याचे देखील आरोप करण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पीडित लोक आणि स्थानिक यांनी रवीनाला घेराव घातला आहे. तसेच पोलिसांना बोलावण्यातच आहे. तर यातील एक पीडित महिला म्हणत आहे. आजची रात्र तुला जेलमध्ये काढावी लागेल. माझ्या नाकातून रक्त येत आहे. यावेळी रवीनाने व्हिडिओ न काढण्याची विनंती देखील केली. तसेच ती म्हणत आहे. मला धक्के देऊ नका मला मारू नका.
Raveena Tandon नेमकं प्रकरण काय?
दरम्यान एक व्यक्ती सांगत आहे की, या घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेल्या त्याची आई, बहीण आणि भाची हे मुंबईतील रिजवी कॉलेज या ठिकाणहून जात होत्या. त्याचवेळी रवीनाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. तसेच आपल्या आई बहिणीने विरोध केला असता त्यांना मारहाण देखील करण्यात आली. यावेळी रवीना नशेमध्ये होती. ती गाडीतून बाहेर पडली तिने देखील या वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. त्यामुळे एकीकडे पुण्यातील अल्पवयीन मुलाच्या पोर्श कार अपघाताचं प्रकरण ताज असतानाच आता अभिनेत्री रवीना टंडनवर देखील शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील बांद्रा या भागामध्ये रवीनाने एका लहान मुलीसह वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घालत त्यांना मारहाण केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे.
कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आरोपीचा खून
याप्रकरणी अद्याप रवीनाकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. याप्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की, रवीना टंडनचा ड्राइव्हर त्याची कार घराच्या आत पार्क करण्यासाठी घेऊन जात होता. त्याचवेळी ती कार रिव्हर्स घेत असताना काही लोक तिथे आले आणि त्यांनी गोंधळ घातला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दोन्ही पक्षांना फिर्याद देण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र याप्रकरणी एकाही पक्षाने तक्रार दाखल केलेली नाही.
Raveena Tandon रवीनाचा पती अनिल थडानीने पोलिस ठाणे गाठले
या घटनेनंतर रवीना टंडन काही वेळातच तेथून निघून गेली. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने खार पोलीस ठाणे गाठले. रवीना टंडनचे पती आणि प्रसिद्ध वितरक अनिल थडानी यांनीही पोलिस स्टेशन गाठले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. गुन्हा नोंदवल्याशिवाय पीडित कुटुंब स्वीकारण्यास तयार नव्हते.