21 C
New York

Raigad Loksabha : रायगड मध्ये मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Published:

पेण

रायगड लोकसभा निवडणूकीची (Loksabha Election) मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती रायगड लोकसभा मतदारसंघाचे उप निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली. रायगड लोकसभा (Raigad Loksabha) सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या ४ जून २०२४ रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत माहिती घेताना उप निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.

६०.५१ टक्के मतदान झाले आहे, यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ३३४ तर महिला मतदार ५ लाख ९ हजार २३३ असल्याची मााहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख ६८ हजार ३७२ मतदार असून ८ लाख ४७ हजार ७६३ महिला तर ८ लाख २० हजार ६०५ पुरष आणि ४ तृतीयपंथीय मतदार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी ७ मे २०२४ रोजी एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीमध्ये एकूण ६०.५१ टक्के एवढे मतदान झाले.

१६ लाख ६८हजार ३७२ मतदार असून त्यापैकी पुरुष मतदार ५ लाख ३३४तर महिला मतदार ५ लाख ९ हजार २३३ मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. येत्या ४ जून २०२४ रोजी अलिबाग येथील क्रीडा संकुलात असणाऱ्या हॉलमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून या निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल.

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना..

रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. चौदा टेबल मतमोजणीसाठी लावण्यात येणार असून २८ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी वेगळ्या टेबलवर होईल. त्याचं प्रमाणे पाच संगणक सुद्धा लावण्यात येणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी किशन जावळे यांच्या अधिपत्याखाली मतमोजणीसाठी ६५० ते ७०० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.

निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना याबाबत सूचना देणे अनिवार्य आहे. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे निवडणूक विभागाकडून यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img