23.1 C
New York

Pravin Darekar : जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर दरेकरांचा गौप्यस्फोटा

Published:

मुंबई

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपा (BJP) किंवा काँग्रेसमध्ये (Congress) जातील असा मोठा दावा भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. दरेकर यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, जयंत पाटील यापूर्वीच भाजपात किंवा काँग्रेसमध्ये जातील असे चित्र होते. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे भविष्य त्यांना माहित आहे. म्हणून अशा प्रकारचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात, असा दावा दरेकरांनी केला. देशातील जनतेचा कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर दिसतोय. त्याचे प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी दिसले. कुठल्याही परिस्थितीत भाजपा ४०० पार होईल याबाबत आमच्या मनात कुठलीही शंका नाही. विजय वडेट्टीवार कशाच्या आधारे बोलतात. त्यांचे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. महाराष्ट्रात त्यांचे काय होतेय हे पहिले त्यांनी पाहावे. ३४० बोलत असताना तिघांचे मिळून ४० असे कदाचित त्यांना बोलायचे असेल, असा टोलाही दरेकरांनी लगावला.

प्रविण दरेकर म्हणाले की, निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार त्यांनी घोषित केला असता. ज्यांच्यात आजही एकवाक्यता नाही, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला जात नसल्याचे समजतेय. शरद पवार, ममता बॅनर्जी जात नसल्याचे समजतेय. निकालाअगोदर इंडिया आघाडीची अशी अवस्था आहे तर भविष्यात काय होणार, अशी टिकाही त्यांनी केली.

प्रविण दरेकर म्हणाले की, महायुतीतील वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज घेतलेले आहेत. महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर एकत्रित बैठक होईल आणि कदाचित महायुतीचा म्हणून त्या-त्या विधानपरिषदेचा उमेदवार समन्वयातून जाहीर होऊ शकतो. बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल.

प्रविण दरेकर म्हणाले की, छगन भुजबळ भुमिका स्पष्ट करणार नाहीत. भुमिका स्पष्ट झाली तर कॅमेरे तिथे जायचे बंद होतील. अशी संदीग्ध भुमिका असेल तर मीडियालाही सनसनाटी मिळते. भुजबळ यात माहीर आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img