23.1 C
New York

Mumbai Airport : कस्टम विभागाची विमानतळावर मोठी कारवाई

Published:

मुंबई

मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) कस्टम विभागाने (Customs) पुन्हा मोठी कामगिरी केली आहे. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने तब्बल 10 किलो सोने (Gold) जप्त केले असल्याची माहिती आहे. कस्टम विभागाकडून (Customs Department) शाम्पू बॉटल तसेच रबर शीटमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या चार प्रवाशांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर कस्टम विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून या चार प्रवाशांची तपासणी करण्यात आली होती या तपासणी दरम्यान आरोपींच्या शाम्पू बॉटल तसेच रबर शीटमधून दहा किलो सोने जप्त करण्यात आले आहे या प्रवाशांनी गुदद्वारातून देखील सोन्याची तस्करी केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणात कस्टम विभागाने चार आरोपींना अटक केली आहे.

याप्रकरणी कस्टम विभागाने 88 लाख रुपयांच्या किमतीचे परदेशी चलन देखील जप्त केल आहे. एकूण 20 प्रकरणांमध्ये कस्टम्स विभागाने ही कारवाई केलेली आहे. आता अटकेनंतर या चार आरोपींची सोन्याच्या तस्करी प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. या सर्वावर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आरोपींच्या चौकशीमध्ये आणखी काही गुन्हेगार जाळ्यात सापडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img