3.1 C
New York

Mosoon : मान्सून ‘या’ तारखेला राज्यात धडकणार, हवामान खात्याने अंदाज

Published:

मुंबई

देशात केरळ येथे मॉन्सून (Mosoon) दाखल झाला आहे. मॉन्सून संथ गतीने वाटचाल करत आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांना मान्सूनचे वेध लागले आहे. दरम्यान, पाऊस राज्यात आणि विशेष: मुंबईत कधी होणार या बाबत हवामान (weather) विभागाने मोठी अपडेट दिली आहे.  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत (Mumbai) ४ ते ५ जूनच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सूनची महाराष्ट्राकडे दमदार वाटचाल सुरु आहे. त्यामुळे मंगळवारी ४ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली. त्यानंतर ६ जून रोजी पुण्यात मान्सून पोहचणार आहे. केरळमध्ये मान्सून आल्यानंतर आधी कोकणात येतो. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवस लागतात. म्हणजेच आठ ते दहा तारखेपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सून दाखल होणार आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

मान्सून दाखल होण्याच्या बातमीमुळे कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सलग चार दिवसांपासून विदर्भात तापमान ४५ अंशांवर आहे. शुक्रवारी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर तापमान काहीसे कमी झाले. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2 जूनपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img