17.2 C
New York

Israel Hamas War :  इस्त्रायल हमास युद्ध थांबणार?

Published:

गाझा पट्टीत सुरू असलेलं विनाशकारी युद्ध थांबवण्याची जबाबदारी आता हमासकडे (Israel Hamas War) आली आहे. कारण इस्त्रायलने युद्धविरामाचा प्रस्ताव दिल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अमेरिकेने ही माहिती दिल्यानंतर आता मागील आठ महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध थांबण्याची शक्यता दिसू लागली आहे. इस्त्रायलने दिलेला हा नवा प्रस्ताव हमासने स्वीकारावा असा आग्रह अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. आता हे युद्ध संपवण्याची वेळ आली आहे, असेही बायडेन यावेळी म्हणाले. इस्त्रायलने जो प्रस्ताव दिला आहे तो तीन भागात आहे.

प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सहा आठवड्यांच्या युद्धविरामाने होईल. यानुसार इस्त्रायल डिफेंस फोर्स गाझातून माघार घेईल. याव्यतिरिक्त गाझातील आवश्यक मदत पाठवण्याची गती वाढविण्यात येईल. हमासच्या ताब्यातील इस्त्रायली नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात हमासच्या दहशतवाद्यांना सोडण्यासही इस्त्रायल तयार आहे. तसेच युद्धामुळे गाझात जो विध्वंस झाला आहे तो दूर करून गाझाचा विकास करण्यासाठी नवीन योजना सुरू करण्यात येतील असे या प्रस्तावात म्हटले आहे.

या ‘एक्झिट पोल’ने पवार, काँग्रेसला धडकी भरवली

इस्त्रायलच्या या प्रस्तावावर हमासनेही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रस्तावाकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो असे हमासने म्हटले आहे. बायडेन म्हणाले, हा एक निर्णायक क्षण आहे. हमासचं म्हणणं आहे की त्यांना युद्धविराम हवा आहे. हमाससाठी सिद्ध करण्याची संधी आहे की खरंच त्यांना युद्धविराम हवा आहे का. युद्धविराम झाला तर या युद्धग्रस्त भागात मदत मिळणे शक्य होणार आहे. या प्रस्तावांतर्गत प्रत्येक दिवशी सहाशे ट्रक मदत गाझात पाठवण्यात येणार आहे. युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्यात हमासने अपहरण केलेले इस्त्रायली नागरिक आणि सैनिकांची वापसी यांचा समावेश आहे.

ब्रिटेनचे विदेश मंंत्री डेव्हिड कॅमेरून यांनीही हा प्रस्ताव हमासने स्वीकारावी अशी विनंती केली आहे. हा प्रस्ताव जर हमासने स्वीकारला युद्ध थांबल्याचं आम्हाला पाहता येईल. आम्ही युद्धविराम व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. यानंतर परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी जे शक्य असेल ते आम्ही करू असे डेव्हिड कॅमेरुन यांनी स्पष्ट केले.प्रस्तावाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हटले आहे की गाझा पट्टीत बंधक केलेल्या ज्या इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला त्या नागरिकांचे मृतदेह हमासने परत करावेत. गाझात जो विध्वंस झाला आहे. शाळा, महाविद्यालयांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पूर्ववत करण्यासाठी अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदाय मोठे पॅकेज देईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img