मुंबई
अभिनेता सलमान खान याच्या पाठीमागील लॉरेन्स बिश्नोई टोळीचं (Lawrence Bishnoi Gang) शुक्लकाष्ठ काही केल्या कमी होताना दिसत नाही. अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे ठार मारण्याच्या कटात सहभागी असलेल्या पाचव्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) अटक केलीय. हरियाणामधील (Haryana Police) भीवाणी येथून जॉनी वाल्मिकी (Johnny Valmiki) या आरोपीला अटक करण्यात आलीय. सलमान खानवरील हल्ला प्रत्यक्षात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आणि आरोपींच्या राहण्याची व्यवस्था जॉनी वाल्मिकी करणार होता. जॉनी हा विडिओ कॉलद्वारे आरोपींच्या संपर्कात होता.
सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गेल्या महिन्यात दोन तरुणांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी या घटनेची गंभीर दखल घेतली होती. तसेच मुंबई पोलीसही या घटनेनंतर जास्त सतर्क झाले आहेत. सलमान खानच्या घरावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपींना गुजरामधून अटक केली होती.
सलमान खान याच्यावर हल्ला करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेला कटाचा थेट पाकिस्तानशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे या कटात तब्बल 70 ते 80 जणांचा समावेश होता. सलमानवर हल्ला करण्यासाठी थेट पाकिस्तानातून AK-47 मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक कट समोर आल्यानंतर पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे. या तपासात पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागत आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी सलमान खान विरोधातच्या नव्या कटप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. याआधी नवी मुंबई पोलिसांनी पनवेल येथून चार आरोपींना अटक केली होती.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेल्या नवीन कटप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हरियाणा पोलिसांनी ही अटक केली आहे. हरियाणा पोलिसांनी दीपक उर्फ जॉनी वाल्मिकी नावाच्या आरोपीला भिवानी येथून अटक केली आहे.
सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मुंबई पोलिसांनी 4 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली होती. या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अटकेतील सर्व चारही आरोपी हे थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात होते. धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटीया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना, झिशान खान उर्फ जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे होती.