19.7 C
New York

BJP : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी ‘या’ नेत्याचे नावाची चर्चा

Published:

नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) साथ ही टप्प्यातील मतदान काल पूर्ण झाले आहे. 4 जून रोजी राज्यात कुणाची सत्ता येईल यावर शिका मुहूर्त होणार आहे. मात्र निवडणुकीच्या नंतर भाजपमध्ये संघटनात्मक मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाल 6 जून रोजी संपणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये (BJP) नवीन अध्यक्ष संदर्भात अनेक नावांवर सध्या चर्चा सुरू असून त्यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचा देखील समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार आहे. जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार असल्याने त्यांच्या जागेवर कुणाची नेमणूक करावी या संदर्भात सध्या भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नेते माजी मंत्री विनोद तावडे यांचे देखील नाव चर्चेत आहे. विनोद तावडे यांचे दिल्लीतील वजन गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मर्जीतील असल्याचं बोललं जात आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांचा कार्यकाळ यावर्षी जून महिन्यात संपणार आहे. त्यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी जुनमध्येच संपला होता. मात्र, लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्यांना 1 वर्ष मुदतवाढ दिली होती. भाजपच्या पक्ष घटनेनुसार, अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाते. नव्या अध्यक्षांनी पदभार सांभाळल्यानंतर संघटनेतील पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यामुळे आता अध्यक्ष बदलल्यावर पदाधिकारीही बदलले जातील.

भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे नाव सर्वात पुढे आहे. यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अतिशय जवळचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही भूपेंद्र यादव यांच्यावर विश्वास आहे. केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यास अध्यक्षपदी भूपेंद्र यादव यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातील एका नेत्याचंही नाव चर्चेत आहे. ते म्हणजे विनोद तावडे त्यांच्यावर लोकसभेत मोठी जबाबदारी देण्यात आली होती. तर ते अमित शहा यांच्या विश्वासातील नेते म्हणूनदेखील परिचित आहेत. भाजपच्या नव्या अध्यक्षपदासाठी आता निवडणूक होणार नाही. पक्षाच्या संसदीय मंडळाकडून नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे नेते असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पद भूषवले आहे. त्यानंतर आता विनोद तावडे यांची या नावाकरिता चर्चा सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील प्रमोद महाजन हे भाजपचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते म्हणून दिल्लीत त्यांची ओळख होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे नेते म्हणून प्रमोद महाजन यांची ओळख होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img