4 C
New York

Mega Block : मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक संदर्भात मोठी अपडेट

Published:

मुंबई

मध्य रेल्वेवरचा (Central Railway) 63 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) रविवारी संपुष्टात आला आहे. ठाणे आणि सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 चे विस्तारीकरण आणि ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 च्या रुंदीकरणाचे काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले होते. त्यातील सीएसएमटी आणि ठाणे येथील स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणचा काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे रविवारी सीएसटीएमवरुन दुपारी 12:30 नंतर वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. तसेच ठाणे रेल्वे स्थानकावरील काम पूर्ण झाल्यामुळे दुपारी 3 वाजेनंतर लोकल सुरु होणार आहे.

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला होता. यामुळे उपनगरीय मार्गावरील ९३० फेरी रद्द करण्यात आल्या. यामुळे ३३ लाख प्रवाशांचे हाल झाले. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने ३०/३१ मे च्या मध्यरात्रीपासून ते २ जून पर्यंत ६३ तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला होता. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तार करण्यासाठी ३०/३१ मे च्या मध्यरात्री ते २ जून च्या दुपारपर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला.

मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक आठवडा पूर्वसूचना देणे अपेक्षित होते. मात्र ब्लॉक सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर ब्लॉकची घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले होते. मध्य रेल्वेच्या या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ऍड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली यावेळी आंदोलन देखील झाले.

मध्य रेल्वेने शुक्रवार 31 मे रोजी मध्यरात्री साडे बारापासून महामेगाब्लॉकला सुरुवात केली होती. नियोजनाप्रमाणे रविवारी 2 जून रोजी दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक होता. परंतु योग्य नियोजन करुन त्या वेळेआधीच काम पूर्ण करण्यात आले. या मेगा ब्लॉकमुळे गेल्या 63 तासांत तब्बल 930 लोकल गाड्या रद्द केल्या गेल्या. तसेच लांब पल्ल्याच्या 72 एक्स्प्रेस रद्द केल्या. काही एक्स्प्रेस ठाणे येथे तर काही दादर येथेच थांबवण्यात आल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img