17.2 C
New York

Madhya Pradesh : प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; सात जणांचा मृत्यू

Published:

मध्य प्रदेशातील श्योपूर येथून एक धक्कादायक (Madhya Pradesh) बातमी समोर आली आहे. येथे शनिवारी अचानक आलेल्या वादळाने बोट नदीत उलटली. या अपघातात 11 प्रवासी नदीत बुडाले. यातील सात जणांचा मृत्यू झाला असून चार जण बचावले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफचे पथकही दाखल झाले. त्यानंतर पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. बोट नदीत होती तेव्हा अचानक वादळ सुरू झाले. त्यामुळे बोट पाण्यात उलटली. यातील तीन ते चार जणांनी पोहून आपला जीव वाचवला मात्र सात जणांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाचा निष्काळजीपणा या घटनेत दिसून आला. रुग्णवाहिका पोहोचण्यास उशी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजता घडली आणि बचावकार्य दोन तासांनंतर म्हणजेच सहा वाजता सुरू करण्यात आले. तहसीलदार सुद्धा तीन तास उशिराने या ठिकाणी पोहोचल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी हजर होते.

हिंगोलीकर 1991 पासूनची परंपरा राखणार का?

काही लोक बोटमधून नदी पार करत होते. एक मोठ्या लाटेने या बोटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे बोट जागीच उलटली. या बोटीतील प्रवासी पाण्यात बुडाले. जर प्रशासनाची पथके वेळेवर येथे पोहोचली असती तर कदाचित बुडणाऱ्यांचा जीव वाचला असता असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. श्योपूरचे जिल्हाधिकारी लोकेश कुमार जांगीड यांनी दिलेल्या माहितीनुसार सरोदा गावात अचानक वादळ आले. या वादळामुळे सीप नदीत एक मोठा भोवरा तयार झाला आणि बोट उलटली. या घटनेत सात जणांचा मृ्त्यू झाला. या घटनेत जे जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img