23.1 C
New York

Baramati Postr War : सुळे, पवारांच्या कार्यकर्त्यांचा पोस्टर वॉर

Published:

बारामती

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) साथी ही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता संपूर्ण देशाला 4 जून रोजी होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. सात टप्प्यातील मतदान काल सायंकाळी 6 वाजता संपले आहे. त्यानंतर अनेक एक्झिट पोल नुसार देशात पुन्हा मोदी सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वर्चस्व असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज लोकसभा मतदारसंघ असलेल्या बारामती (Baramati) मध्ये आतापासूनच उत्साही कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्याच्या विजयाचे बॅनर (Baramati Postr War) झळकतांना दिसत आहे. त्यामुळे बारामती मध्ये अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असा बॅनर वॉर सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तासच उरले असताना इंदापूरात मात्र बॅनर वॉर पहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावल्याचे पहायला मिळाले. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष वसिम बागवान यांनी आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावले आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच लावलेल्या या बॅनर्सची सध्या कगळीकडे चर्चा होत आहे.

दरम्यान, एक जूनचे मतदान संपल्यानंतर संध्याकाळी वेगवेगळ्या माध्यम संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले. या आकड्यांच्या मदतीने देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीए सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या निवडणुकीत एनडीएला (NDA) 353-383 तर इंडिया आघाडीला (INDIA Alliance) 152-182 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र यावेळी महायुतीच्या जागा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 23 ते 25 आणि महायुतीला 22 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. यामध्ये महायुतीतील भाजपला 17, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येकाँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 ते 11 जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 3-5 जागा दाखविल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दहा जागा लढल्या आहेत. परंतु काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. काँग्रेसला केवळ तीन ते चार जागा मिळताना या पोलनुसार दिसत आहे.

Loksabha Exit Poll इंडिया टुडेचे एक्झिट पोल

महाराष्ट्र जागा-48
भाजप-20-22
शिवसेना-8-10
अजित पवार-1-2
शरद पवार-3-5
काँग्रेस-3-4
शिवसेना (ठाकरे गट) 9-11
अपक्ष-0-2

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img