17.2 C
New York

Kalamba Central Jail : कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आरोपीचा खून

Published:

कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून (Kalamba Central Jail) करण्यात आला आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असे सदर मृत आरोपीचे नाव असून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. दोन गटातील मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे. या एकूण प्रकारामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असून आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असताना त्याचा खून करण्यात आला आहे.

मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. तो कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान हा हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला होता. तेव्हा, त्याच्यावर हल्ला करण्यात आला. न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मुन्नावर हल्ला केला. या हल्ल्यात मुन्नाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, काही महिन्यांत कळंबा कारागृहातील कैद्यांकडे 80 पेक्षा अधिक मोबाईल आढळले होते. याप्रकरणी कारागृहाती दोन अधिकाऱ्यांसह 9 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली होती. तर, दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली होती.

ठाकरे गटासंदर्भात शिंदे गटाच्या खळबळजनक दावा

या एकूण संपूर्ण प्रकारानंतर जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना कारागृहात घडत आहेत. कारागृहात वर्चस्व राहावं त्यामुळं वारंवार अशाप्रकारच्या हाणामारी होत असतात. मात्र, त्याकडे कारागृहाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सुमारे दीड महिन्यापूर्वी कळंबा कारागृहात कैदी मोबाईल वापरत असल्याची टीप तुरुंग अधिकाऱ्यांना दिल्यानं गुंडाला १४ जणांनी मारहाण केली होती. यावेळी तुरुंगातील सुभेदार उमेश शामू चव्हाण जखमी झाले होते. आता तर थेट तुरुंगात 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

Kalamba Central Jail कळंबा कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर

कैद्यांमधील मारामारीचा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहात जाऊन पंचनामा केला. गेल्या दीड ते दोन महिन्यात शंभराहून अधिक मोबाइल सापडल्याने कळंबा कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष तपासणी मोहीम राबवून ११ कर्मचाऱ्यांसह २ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले, तर २ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. त्यानंतरही कळंबा कारागृहातील गैरप्रकार थांबलेले नाहीत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img