8.5 C
New York

Salman Khan : सलमान खानला घरात घुसून ठार मारण्याचा कट उधळला

Published:

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्यावरील हल्ल्याचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. पनवेल पोलिसांनकडून चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित आहेत. 14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेगवान तपास करत आरोपींना अटक केली. आता पनवेल पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याची योजना लॉरेन्स बिश्नोई टोळीने पनवेलमध्ये आखल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे विकत घेण्याची योजना होती. नवी मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात असलेला गँगस्टर बिश्नोईने त्याचा कॅनडास्थित चुलत भाऊ अनमोल बिश्नोई आणि सहकारी गोल्डी ब्रारसोबत मिळून पाकिस्तानातील एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून एके-४७, एम-१६ आणि इतर अत्याधुनिक शस्त्रे खरेदी अभिनेत्याच्या हत्येचा कट रचला जाणार होता. ही माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांना मिळालेल्या टीपनुसार, या प्लॅनमध्ये सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊस आणि त्याच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सना अटक होण्याच्या एक महिन्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळी तयार झाल्याचेही समोर आले आहे. नवी मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे आणि अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याच्या योजनेचा तपास करत आहेत.

मुंबईकरांची आजही धावपळ, 161 लोकल फेऱ्या रद्द

Salman Khan अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करण्याचा प्रयत्न

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने कॅनडामध्ये असलेला त्याचा चुलत भाऊ अनमोल बिष्णोई आणि सहकारी गोल्डी ब्रार याने एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून AK-47, M-16 आणि AK-92 खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अभिनेता सलमान खानला मारण्याचा कट पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करून रचला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Salman Khan सलमान खानच्या घराबाहेर केला होता गोळीबार

१४ एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घराबाहेर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला आणि तिथून पळ काढला होता. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती. सूत्रधारांच्या सांगण्यावरून शूटर विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी पनवेलमध्ये भाड्याने घरही घेतले होते. त्यांनी येथे दुचाकी घेतली होती. काही दिवसांनंतर दोन्ही शूटर्सना पिस्तुले देण्यात आली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img