18 C
New York

Porsche Car Accident : पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार

Published:

पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्श कारने (Porsche Car Accident ) दोघांना चिरडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. हे प्रकरण अद्यापही चर्चेत आहे. दरम्यान, आता पुणे पोलीस (Pune Police) अल्पवयीन मुलाची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांना ही परवानगी बाल न्याय मंडळाने (Juvenile Justice Board) दिली आहे.

19 मे रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्श कारने एका दुचाकीला जबर धडक दिली होती. त्यात दोघांना मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. तर त्याच्या वडिल आणि आजोबांना अटक करण्यात आली. आतापर्यंत या अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या मित्रांचेही जबाब नोंदवण्यात आले होते, मात्र अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता. त्यामुळं पुणे पोलिसांनी बालहक्क न्याय मंडळाला पत्र लिहून अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी मागितली होती.

पुणे हिट अँड रन प्रकरणी शिवानी अग्रवालला अटक

यानंतर बालहक्क न्याय मंडळाने पोलिसांना तपासाची परवानगी दिली आहे. शनिवारी (दि. 31 मे) दोन तास अल्पवयीने मुलाची चौकशी होणार आहे. या अल्पवयीन मुलाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि दोन महिला पोलीस अधिकारीकरणार आहेत. पुणे क्राईम ब्रांचची टीम बालसुधारगृहात जाऊन अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहेत. पालक उपलब्ध नसल्याने बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत गुन्हे शाखेकडून अल्पवयीन मुलाची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान,पोर्श कार 2025 पर्यंत रस्त्यावर उतरवण्यास या भीषण अपघातानंतर आता मनाई करण्यात आली.पुढील वर्षापर्यंत प्रादेशिक परिवहन मंडळाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img