23.1 C
New York

Amol Mitkari : मेधा कुलकर्णींचा वार मिटकरींचा पलटवार

Published:

सध्या राज्यसभेच्या नवनियुक्त भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि आजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मिटकरी यांचं नाव घेऊन कुलकर्णी यांनी नुकताच एका कार्यक्रमात बोलताना नव्याने दावा केला होता. आता त्यावर आमदार मिटकरी यांनी जोरदार पलटवार केला आहे. (Amol Mitkari) मिटकरी म्हणाले, आयोजकांकडून जेव्हा मला समजलं की, ‘त्या’ स्टेजवर आहेत तेव्हा मीच सांगितलं, की स्वतःला एका समाजापुरते समजणाऱ्या व्यक्तींबरोबर मला स्टेजवर बसायचं नाही. (Medha Kulkarni) तसंच, मेधा कुलकर्णी यांचं वक्तव्य साफ चुकीचं असून त्यांनी आपल्या समाजाची माफी मागावी, अशी मागणीही मिटकरींनी केली आहे.

Amol Mitkari काय म्हणाले मिटकरी?

लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहं भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात. ज्या वेळी कोणी त्या सभागृहांचा सदस्य होतो, त्यावेळी त्याला जी शपथ दिली जाते, ती खूप महत्त्वाची असते. शपथ घेतल्यावर तो सदस्य कोण्या एका समाजाचा राहत नाही. तो देशाचा होतो. आणि शपथ घेऊनही कोणी आपण एका समाजापुरते आहोत, असं वागत असेल, तर भारतीय राज्यघटनेच्या विचारधारेला ते छेद देण्यासारखं आहे. असाच काहीसा प्रकार सांगलीत राज्यसभेच्या खासदाराकडून घडला आहे, असं अमोल मिटकरी मेधा कुलकर्णींचं नाव न घेता म्हणाले आहेत.

दुष्काळी भागात लाचखोर अभियंता

Amol Mitkari मीच सांगितल नको म्हणून

त्याचबरोबर ‘त्यांनी’ बोलताना बारामतीचा एक दाखला दिला, त्यात त्यांनी तुमचा दाखला दिला असं विचारलं असता मिटकरी म्हणाले, राज्यसभेच्या खुर्चीवर बसलेली व्यक्तीही जनतेशी कशी खोटू बोलू शकते. वस्तुस्थिती ही आहे, की बारामतीच्या प्रचाराच्या वेळी योगायोगाने एकाच स्टेजवर युवक मेळावा होता, त्याला आमचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाणही होते. ते आणि मी एका गाडीने गेलो. त्या अगोदरच या सन्माननीय सदस्या स्टेजवर बसलेल्या होत्या. जेव्हा मला आयोजकांकडून समजलं, की त्या आहेत, तेव्हा मीच आयोजकांना सांगितलं की मला अशा व्यक्तीबरोबर स्टेजवर बसायचं नाही, जे स्वतःला एका समाजापुरते समजतात असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

Amol Mitkari लोकांना खूश करण्यासाठी

इतक्या दिवसांनी आठवणींना उजाळा देताना, समोर बसलेल्या व्यक्तींच्या टाळ्या मिळवणं आणि खुश करणं, यासाठी त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. असं मतही मिटकरी यांनी व्यक्त केलं. दरम्यान, खासदार मेधा कुलकर्णी सांगलीत बोलताना, साधेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. चुका आपल्या असतील तर ऐकून घेऊन त्या दुरुस्त करणही आपलंच काम आहे. मात्र, विनाकारण कोणी शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही. म्हणूनच पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्टा करणारे आमदार अमोल मिटकरी ज्या व्यासपीठावर असतील त्या व्यासपीठावर मी जाणार नाही अशी ठोस भूमिका घेतली असं म्हणल्या होत्या. त्याला प्रतिउत्तर देताना मिटकरी बोलत होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img