21 C
New York

Ajit Pawar : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांनी आयुक्तांना फोन केला होत का?

Published:

पुणे कार अपघात प्रकरणामध्ये रोज नवीन घटना घडत आहेत. आज कार चालक आरोपीच्या आईला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत एकूण दहा जणांना अटक झाली आहे. (Car Accident) त्यामध्ये बिल्डर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचा समावेश आहे. (Pune Accident) आता त्या मुलाची आई शिवाणी अग्रवाल यांचाही यामध्ये समावेश आहे. (Ajit Pawar) आता या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात आरोप होत आहेत. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्याबद्दलही अनेक वेगवेगळे आरोप होत आहेत. त्यांनी आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय दबाव आणला होता असा थेट आरोप होत आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केलो होता? असे आरोप होत आहेत. त्या सर्व आरोपांवर अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

Ajit Pawar हे प्रकरण जनतेचे प्रकरण झालं

अजित पवार यांच्याशी बोलताना माध्यामांनी अजित पवार यांना आमदारांनी दबाव आणला का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वचं ठिकाणी आमदार एखादी घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात जात असतो. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना योग्य चौकशी करण्याचा सूचना देतो. त्यामुळे आमदार सुनील टिंगरेही अशाच पद्धतीने गेले होते. मात्र, त्यांनी कोणताही दबाव आणलेला नाही असं अजित पवार म्हणाले आहेत. तसंच, आता हे प्रकरण जनतेचे प्रकरण झालं आहे. या प्रकरणात चौकशी पारदर्शकपणे करा. कोणाच्या दबावास बळी पडू नका, इतक्याच सूचना आम्ही अधिकाऱ्यांना करत आहोत असंही ते यावेळी म्हणाले.

पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार

Ajit Pawar आमचे शिफारस पत्र असते

आपण पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? या प्रश्नावर पवार म्हणाले, आपण फोन केला नाही. या प्रकरणात फोन केला असता तरी जखमींना मदत तातडीने द्या आणि आरोपींवर कारवाई करा, अशाच सूचना आम्ही देत असतो असंही ते म्हणाले. दरम्यान, पुणे अपघात प्रकरणातील डॉ. अजय तवारे यांची शिफारस मंत्री हसन मुश्रीफ आणि एनसीपी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस केल्याचे समोर आलं. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, बदलीची शिफारस आम्ही करतो. परंतु, ते नियमात आहे की नाही, हे बघण्याचं काम अधिकाऱ्यांचं आहे. आमचे शिफारस पत्र असते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नियम पाहून बदली करायला पाहिजे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img