6.2 C
New York

Beed : दुष्काळी भागात लाचखोर अभियंता

Published:

परळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांना Beed लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या ते पीसीआरमध्ये असून एसीबीने आज त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मिरज येथील लॉकरची झडती घेतली. (Gold found) त्यामध्ये रोख ११ लाख, ८९ हजार व बिस्किटांसह दीड कोटींचं सोनं आढळून आले. इतकं सोनं सलगरकर यांच्याकडे कसं आलं याचा तपास बीड पोसीस करत आहेत.

बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे कारनामे बाहेर येत आहेत. दरम्यान, एसीबी विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. (Beed Police) मात्र, तसं असतानाही लाचखोरांना पकडण्याच्या कारवाया सुरूच आहेत. यामध्ये झडती पथक प्रमुख पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवार तसंच त्यांच्यासोबत हनुमान गोरे, अमोल खडसारे, अंबादास पुरी यांनी काम पाहिलं आहे.

शनिवार वाडा परिसरात आढळली बेवारस बॅग

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, हनमान गारे, अमोल खरसाडे यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज येथील युनियन बँक ऑफ इंडियातील लॉकरची झडती सलगरकर यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष घेतली. यावेळी एकूण २ किलो १०५ ग्रॅम सोनं, ज्यामध्ये १ हजार ११४ ग्रॅम वजनाचे सात बिस्किटे व ९९१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले. यामध्ये सोन्याच्या एकूण ऐवजाची किंमत अंदाजे १ कोटी ५० लाख रुपये आहे.

यामध्ये जप्त केलेला ऐवज एकूण १ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा आहे. याबाबतची माहिती लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. याच राजेश सलगरकर याला शेतकऱ्यांकडून गाळ काढून शेतात टाकण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच घेताना २२ मे रोजी पकडलं होतं. माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळीतील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर राजेश सलगरविरुद्ध परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img