19.7 C
New York

Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटी ३ मधून सलमानची एक्झिट, अनिल कपूर नवा होस्ट

Published:

Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटीचा नवा सिझन (Bigg Boss OTT 3) जूनमध्ये येणार आहे. अशातच या शोच्या होस्टच्या (Host) खुर्चीचा मालक कोण असणार आहे याचा देखील खुलासा करण्यात आलाय.

Bigg Boss OTT 3 : रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी गेल्या ३ वर्षांपासून टीव्हीवर पाहायला मिळतोय. गेल्या ३ वर्षांपासून बिग बॉस ओटीटी कार्यक्रमाला सुद्धा प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. ‘बिग बॉस ओटीटी सिझन १’ची विजेती दिव्या अगरवाल (Divya Agarwal) होती तर बिग बॉस ओटीटी सिझन २ चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) होता त्यानंतर हा शो जास्तच चर्चेत आला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या कार्यक्रमाचा तिसरा सिझन सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. नेहमीप्रमाणेच ‘बिग बॉस ओटीटी ३’ जिओ सिनेमावर प्रसारित होणार असून त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. अशातच या प्रोमोमध्ये होस्ट अनिल कपूर (Anil Kapoor) यांची झलक दाखवून “झकास झकास खूप झालं, आता काही तरी करूयाना खास” असं अनिल कपूर यांनी म्हंटल आहे.

तसंच, मराठी बिग बॉस ५ ची सुद्धा घोषणा झाली. यामध्ये महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) होस्ट ची एक्सिट घेतली असून या सिझन ची होस्टिंग रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) होस्ट करणार आहेत. सलमान खानने (Salman Khan) आतापर्यंतचे हिंदीचे सर्वच सिझन होस्ट केले आहेत. करण जोहरने (Karan Johar) बिग बॉस ओटीटीचा पहिला सिझन होस्ट केला होता तर दुसरा सिझन सलमान खानने केला होता. मात्र, आता ‘बिग बॉस ओटीटी सिझन ३ची’ होस्टिंग अनिल कपूर करणार आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण अनिल कपूर यांचा अभिनय पाहता पाहता आता त्यांची होस्टिंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

http://सलमान खानला घरात घुसून ठार मारण्याचा कट उधळला

अनिल कपूरची होस्ट म्हणून एन्ट्री
इंस्टाग्रामवर जिओ सिनेमाच्या अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. त्यात त्यांनी म्हंटल कि, बिग बॉस ओटीटी ३च्या सिझनची एक नवा होस्ट आणि त्यांचा बुलंद आवाजच पुरेसा आहे. या जुनमध्ये जिओ सिनेमा प्रीमियरवर बिग बॉस OTT ३चा सिझन येत आहे. जुन २०२४ मध्ये ओटीटीचा ३रा सिझन कोणत्याही तारखेपासून सुरु होऊ शकतो. आता सलमान खान आणि करण जोहर नाही तर अनिल कपूर यांच्या हाती होस्टिंग शोचा धुरा सोपवण्यात आलाय.

‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये कोणते स्पर्धक झळकतील ?
या सिझनमध्ये अद्याप कोणत्याही स्पर्धकांची नावे अधिकृतपणे उघड करण्यात आलेली नाही आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार, रियाझ अली, शिवांगी जोशी, अरहान बहल, विकी जैन, शीझान खान, दलजित कौर, आणि व्हायरल वडापाव गर्ल चंद्रिका यांसारखे टीव्ही सेलिब्रिटी किंवा युटूबर या शोमध्ये स्पर्धक म्हणून पाहायला मिळतील.मात्र, या शोमध्ये नेमकं कोण असणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img