10.7 C
New York

Shaniwar Wada : शनिवार वाडा परिसरात आढळली बेवारस बॅग

Published:

पुणे शहरातून महत्वाची बातमी समोर आली आहे. (Shaniwar Wada) ऐतिहासिक वारसा असलेल्या शनिवारवाड्यात एक बेवारस बॅग आढळली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून शनिवारवाड्याचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. या बॅगेत बॉम्ब तर नाही ना? समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या आसपास शनिवार वाड्यासमोर एक बेवारस बॅग आहे असा फोन पोलीसांना आला होता. धटनास्थळी पोहोचल्यानतर बॉम्ब शोधन पथकाने तपास सुरु केला आहे.पर्यटकांनी गजबजलेला शनिवार वाडा काही क्षणात रिकामा करण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार, आज (शनिवार, १ जून) सकाळी साडेनऊच्या सुमारास कंट्रोल रूमला एक फोन आला. शनिवार वाड्यासमोर (Shaniwar Wada) एक बेवारस बॅग आढळली असे फोनवरील व्यक्तीने सांगितले. ही माहिती कळताच पुणे पोलिस तसेच बॉम्ब शोधक पथकाने तातडीने तेथे धाव घेतली. आणि त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने तपास सुरू केला. कसून बेवारस बॅगेची तपासणी सुरू असल्याचे समजते आहे.

पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार

सध्या सुट्टीचे दिवस असल्याने आणि आज वीकेंड असल्याने मोठ्या प्रमाणत लोकं, पर्यटक शनिवारवाडा (Shaniwar Wada) पाहण्यासाठी आले होते. मात्र बेवारस बॅगेची बातमी ऐकताच एकच घबराट पसरली आणि लोकांनी बाहेर धाव घेतली. मात्र, आत्तापर्यंत अशी कोणतीही संशयित वस्तू किंवा बॅग इथे आढळून आली नाही. शनिवारवाड्यात (Shaniwar Wada) आतला संपूर्ण परिसर चेक करण्यात येत आहे. फायर ब्रिगेडची टीमही घटनास्थळी आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Shaniwar Wada तो फेक कॉल होता ?

आज सकाळी नियंत्रण कक्षाला एक कॉल आणि शनिवारवाड्यात बेवारस बॅग ठेवली असून त्यामध्ये बॉम्ब आहे, असे फोनवरील व्यक्तीने सांगितले. त्या अनुषंगाने आम्ही सध्या तपास करत आहोत. बॉम्बशोधक पथकही बोलावण्यात आलं आहे. पण आत्तापर्यंत अशी कोणतीही संशयित वस्तू किंवा बॅग इथे आढळून आली नाही. शनिवारवाड्यात आतला संपूर्ण परिसर चेक करण्यात येत आहे. फायर ब्रिगेडची टीमही घटनास्थळी आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तो फेक कॉल असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img