19.4 C
New York

Pune Collector : पुणे जिल्हाधिकाऱ्यामुळे आत्महत्येची वेळ; प्रांताधिकाऱ्याचा आरोप

Published:

लोकसभा निवडणुकीचा शेवचा टप्पा उद्या पार पडतोय. त्यानंतर काही चार दिवसांत निकाल लागणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच अनेक खळबळजनक प्रकार समोर येत आहेत. आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर (Pune Collector) त्यांच्याच ‘टीम’मधील असलेल्या प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी गंभीर आरोप केले आहेत. तसंच, ‘राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सांगण्यावरून दिवसे आपला मानसिक छळ करत आहेत. त्यांच्या त्रासामुळे माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे असा थेट आरोप करून कट्याने यांनी प्रशासना मोठा भूकंप घडवला आहे.

Pune Collector राजकीय हितसंबंचा आधार घेतला

कट्यारे यांनी पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणीआधी त्यांची बदली करावी अशी मागणी केली आहे. तसंच, सुहास दिवसे हे खेड आळंदीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पी एम आर डी ए चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला आहे असही कट्यार म्हणाले आहेत.

एअर इंडियाच्या विमानाचा एसी बंद, प्रवासी वैतागे

Pune Collector ते मला मानसिक त्रास देतात

सुहास दिवसे यांनी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर ते मला लक्ष करुन त्रास देत आहेत. लोकसभा निवडणूक काळात या निवडणूक अधिकारी असलेले दिवसे मला वारंवार अपमानित करतात. खर तर मी यापुर्वी त्यांच्या हाताखाली प्रत्यक्ष कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे केवळ विद्यमान लोकप्रतिनिधी त्यांना जे सांगतात तेच खरं असं समजून ते मला मानसिक त्रास देत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी माझ्याकडे पूर्व चक्राकार मार्गाचा खेड तालुक्याचा कार्यभार कोणतेही खात्री न करता केवळ विद्यमान लोकप्रतिनिधी यांचं ऐकूण अचानकपणे काढून घेतलेला आहे असंही कट्यारे यांनी पत्रात म्हटल आहे.

Pune Collector आमदारांना भेटत होते

सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना, (28 मे)रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला.‌ सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केलं आहे. असा थेट आरोपच त्यांनी केलाय. त्याचबरोबर‌ सुहास दिवसे हे निवडणुकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते. या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Pune Collector कोण आहेत जोगेंद्र कट्यारे?

जोगेंद्र कट्यारे हे सध्या खेड-राजगुरूनगर प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 23 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 10 वर्षे नायब तहसीलदार, 8 वर्षे तहसीलदार, 5 वर्षे प्रांताधिकारी म्हणून सातारा, सांगली, नागपूर आणि पुणे जिल्ह्यात काम पाहिलं आहे. आता जोगेंद्र कट्यारे यांच्या पत्रानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img