19.4 C
New York

Heat Wave : देशात उष्णतेचा कोप

Published:

देशभरात उष्णतेचा कोप झालाय. (Heat Wave) कधी नव्हे इतका सूर्य तापलाय. देशात अनेक राज्यांमध्ये उष्मघाताने मृत्यू होतोय. यामध्ये बिहार-झारखंड, ओडिशा या राज्यासह इतर अनेक राज्यांमध्येही उन्हामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात गंभीर उष्णतेची मोठी लाट आलेली आहे. तसंच, ती कायम राहिल्याने किमान सुमारे 54 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त नोंदवलं गेलंय.

Heat Wave सर्वाधिक मृत्यू बिहारमध्ये

देशातील सुमारे 6 राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. त्यामुळे सुमारे 54 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू 44 जणांचा मृत्यू बिहारमध्ये झाला आहे. ओडिशाच्या राउरकेलामध्ये 6 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश, अशा अनेक राज्यांमध्ये लोकांनी आपले जीव गमावले आहेत. गेल्या काही दिवसांत देशभरात तापमानाचा विक्रम मोडला गेलाय. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, लडाख, जम्मू आणि काश्मीर, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुढील पाच दिवस तापमान 2-4 अंशांपेक्षा कमी असू शकत असा अंदाजही वर्तवण्या आला आहे.

Heat Wave 20 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये अनेक ठिकाणी उनाचा पारा 44 अंश सेल्सियसहून पुढे गेला आहे. राज्यातील 3 जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद आरोग्य विभागाच्या माहितीनुसार या तापमानामुळे 12 जणांचा मृत्यू झाला. तर, 20 पेक्षा अधिक लोक विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 5 जणांचा मृत्यू झाला. तर ओडिशामध्येही अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

एअर इंडियाच्या विमानाचा एसी बंद, प्रवासी वैतागे

Heat Wave 8 जणांचा जीव गेला

ओडिशा येथील राऊरकेला सरकारी रुग्णालयाचे प्रभारी संचालक डॉ. सुधारानी प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मृत्यू दुपारी दोन वाजल्यापासून ते सहा तासांच्या आत झालं. रुग्णालयात पोहोचेपर्यंत 8 जणांचा जीव गेला होता. बाकी लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Heat Wave झारखंडमध्ये 5 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत झारखंडमध्ये एक एक करून 5 जणांचा मृत्यू झाला. तर बिहारच्या विविध जिल्ह्यातूनही व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे बिहारच्या औरंगाबादमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. बक्सरमध्ये दोन मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर आरामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला.

Heat Wave ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने आज देशभरात कुठेही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केलेला नाही. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंडच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये रात्री उष्ण हवामान असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img