8.4 C
New York

Sunny Deol: सनी देओलच्या अडचणीत वाढ; फसवणुकीचा गुन्हा दाखल!

Published:

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या तो वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सनी देओलवर फसवणूक आणि खंडणी वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपट निर्माता सौरव गुप्ता याने सनी देओल यांच्यावर आरोप केला आहे. त्याच्या विरोधात फसवणूक, खंडणी वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. सौरभ गुप्ता हा चित्रपट निर्माता असून रिअल इस्टेट डेव्हलपर आहे. सनी यांनी चित्रपटात काम करायचे आहे म्हणून पैसे घेतले पण चित्रपट केला नसल्याचे त्यांनी सांगितले.

सौरव गुप्ता यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये त्यांनी चित्रपटासाठी सनी देओलसोबत मुख्य भूमिकेसाठी 4 कोटींची डील केली होती. यातील एक कोटींची रक्कम अॅडव्हान्स दिले होते. मात्र, त्यांनी आमचा चित्रपट पूर्ण करण्याऐवजी २०१७ मध्ये रिलीज झालेल्या पोस्टर बॉईज या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्याचा पर्याय निवडला. सनी देओलला अॅडव्हान्स रक्कम देऊनही तो अधिक पैशांची मागणी करत राहिला. सौरभ गुप्ताने एक दावा मांडला. सौरभ म्हणाला सनी देओलच्या खात्यात माझे दोन कोटी 55 लाख रुपये आहेत. त्याने मला दुसऱ्या दिग्दर्शकालाही पैसे देण्यास सांगितले होते असा दावाही त्यांनी केला.

अनंत-राधिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली; मुंबईत होणार ‘शुभ विवाह’

सनी देओलवर गंभीर आरोप केला आहे. निर्माते सौरव गुप्ता यांनी सांगितले की, २०२३ मध्ये सनी देओलने माझ्या कंपनीसोबत एक बनावट करार केला होता. जेव्हा आम्ही हा करार केला तेव्हा त्या करारनाम्यातील मधले पानही बदलण्यात आले होते. त्या ठिकाणी चित्रपटात काम करण्याच्या मानधनाची रक्कम 4 कोटींहून 8 कोटी करण्यात आली. तर, नफा दोन कोटी करण्यात आला. त्यामुळे सौरभ गुप्ताच्या या आरोपामुळे सनी देओल चांगलाच अडचणीच्या भोवऱ्यात सापडला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img