लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरच्या (Pandharpur) विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या मंदिरात सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. अशातच आज मंदिर परिसरात कानोपात्रा मंदिराजवळ भुयार आढळून आले आहे. सात- ते आठ फुटाचे हे भुयार असल्याचे सांगण्यात येत असून आतमध्ये देवाची मुर्ती असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या संवर्धन तसेच सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. ७३ कोटी रुपयांच्या आराखड्याचे काम विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी सुरू आहे.
अशातच आज मंदिर परिसरातील कानोपात्रा मंदिराजवळ अंतर्गत भुयार आढळून आले. सात ते आठ फूट खोलीचे हे भुयार असल्याचे सांगण्यात येत असून त्यामध्ये मूर्ती असण्याची शक्यता आहे. मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबतची माहिती दिली असून पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदीरात पोहोचले आहेत. या तळघरात मुर्ती सदृष्यवास्तू असल्याचे दिसून आले आहे. या तळघरात नेमके काय आहे, हे तळघर केव्हाचे आहे, तळघर आहे की येथून भुयारी मार्ग आहे. याबाबत अधिक माहिती मंदिर समिती पुरातत्व विभाग, महाराज मंडळी, जानकारांकडून घेतली जात असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
दरम्यान, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे मुळ रुप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत. यासाठी सुमारे 800 ते 900 किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. विठ्ठल गर्भ गृहाच्या मुख्य दरवाजा बरोबरच चौखांबी आणि सोळखांबी मंडपातील आठ दरवाजांवर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे.
Pandharpur आज सायंकाळी तज्ज्ञ करणार पाहणी
आज (शुक्रवार) सायंकाळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, वास्तुविशारद तेजस्वीनी आफळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, महाराज मंडळी, तज्ञ यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात येणार आहे.