लोकसभेच्या प्रचार काल थंडावला. (Election 2024) सातव्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. हा लोकसभेचा शेवटचा टप्पा. त्यामध्ये आठ राज्यांमध्ये उद्या मतदान होत आहे. (Lok Sabha Election) यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. दरम्यान, भाजपने शेवटचा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच आपल्या कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू केलं आहे. (Last Phase) पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे गृहमंत्री अमित शहा व वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी रात्री बैठक झाल्याची माहिती समोर आलीये.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या शेजारी-शेजारी असलेल्या राज्यामध्ये यावेळी भाजपसाठी काही अनूकुल वातावरण नाही असा एकंदरीत सूर आहे. कर्नाटकमध्ये २०१९ च्या तुलनेत भाजपच्या काही जागा कमी असू शकतात. कर्नाटकात भाजपने गेल्या वेळी २५, तर महाराष्ट्रात २३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी विशेषतः महाराष्ट्रात काही जागांवर मित्रपक्षांचं जास्त नुकसान होऊ शकतं असा भाजपचा फीडबॅक आहे.
मतदारसंघात वाढली सत्ताधारी-विरोधकांची ‘धाकधूक’
Lok Sabha Election ‘यूपीए’ने केवळ नऊ जागा जिंकल्या
भाजपला २०१९ च्या तुलनेत ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित आहे. याच राज्यांमध्ये लोकसभेच्या २४४ जागा आहेत. त्यामध्ये गेल्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी यापैकी ९४ जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये या ५७ जागांपैकी भाजपप्रणित ‘एनडीए’ने ३२, तर तत्कालीन ‘यूपीए’ने केवळ नऊ जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र, पंजाबमध्ये आप, भाजप, काँग्रेस आणि अकाली दल यातील प्रत्येकजण यंदा स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.
Lok Sabha Election १४०हून अधिक रॅली आणि रोड शो
निवडणूक प्रचाराच्या काळात ७५ दिवसांत पंतप्रधान मोदींनी १७२ जाहीर सभा आणि रोड शो केले. अमित शहा यांनी सुमारे २२१ सभा व रोड शो केले. भाजपाध्यक्ष जे, पी, नड्डा यांनी १३४ सभा घेतल्या. तर, विरोधकांत राहुल गांधींनी सर्वाधिक किमान १०७ सभा आणि रोड शो केले. प्रियांका गांधी यांनी सर्वाधिक सभा, रोड शो आणि माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी १४०हून अधिक रॅली आणि रोड शो केले. १०० बाइट्स/टिकटॉक आणि मुलाखती दिल्या. तसंच, पाच वृत्तपत्रांना दीर्घ मुलाखती दिल्या आहेत.