3.6 C
New York

PM Narendra Modi : वंचितचा मोदींना खोचक टोला

Published:

मुंबई

मोदी (PM Modi) हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) नामांकन का मिळाले नाही. अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Alliance) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा खोचक टोला लगावला आहे. मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही? काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत:ची देवासोबत तुलना केली होती. जर ते खरोखरच देव असतील, तर ते स्वत:ला कोणाशी जोडण्यासाठी ध्यान करत आहेत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे आले. काल त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यान धारणेला सुरुवात केली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या तस्वीरीसमोर त्यांनी ही साधना सुरू केली आहे. 45 तास त्यांची ध्यान धारणा असणार आहे. तर 35 तास ते मौनव्रतही करणार आहेत. या काळात मोदी अन्न घेणार नाहीत. फक्त नारळ पाणी आणि द्राक्षांचा रस घेणार आहेत. त्यांची ही साधना 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे. मोदी ज्या ठिकाणी ध्यानधारणा करत आहेत, तिथेच 1892 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती.

मोदी काल भगवती अम्मनला गेले होते. दक्षिण भारतीय पारंपारिक वस्त्र परिधान करून ते अनवाणी पावलांनी मंदिरात गेले होते. त्यानंतर त्यांनी भगवती अम्मन मंदिरात पुजाऱ्यांसोबत विधिवत पूजा केली. मंदिरात संध्याकाळी आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मंदिराची परिक्रमाही केली. यावेळी पुजाऱ्याने मोदींना अंगवस्त्र दिलं. देवीची एक मूर्तीही भेट दिली. अम्मन मंदिर हे 108 शक्तिपीठांपैकी एक आहे. हे मंदिर सुमारे 3 हजार वर्ष जुने आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img