राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज (Chhagan Bhujbal) असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घ्यावी लागल्याने भुजबळ नाराज होते. परंतु, मी नाराज नाही असे त्यांनी सांगितले होते. तरीदेखील त्यांच्या नाराजीच्या चर्चा कमी झाल्या नाहीत. आता छगन भुजबळांनी मी नाराज नाही असे स्पष्ट केले आहे. राज्यसभेचे काय बोलता मी लोकसभा सोडली. मी नाराज नाही असे भुजबळांनी स्पष्ट केले. भुजबळांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली.
राज्यसभेवरून छगन भुजबळ नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, मी नाराज नाही. तुम्ही राज्यसभेचं काय बोलता मी लोकसभा सोडली. मी नाराज नाही. मी समता परिषदेच्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे खोटं बोलणं मला जमत नाही. जे काही असेल ते स्पष्टपणे मांडत असतो. विरोधासाठी विरोध करणं मला जमत नाही, असे भुजबळ म्हणाले. भुजबळांनी मनुस्मृतीवर देखील भाष्य केल. मनुस्मृतीत महिलेला कोणताच अधिकार नाही. मनुस्मृती समता परिषदेच्या विचारांशी विसंगत आहे. आमच्या विचारधारेत ती बसत नाही. यामुळे शालेय अभ्यासक्रमात तिचा समावेश करण्यास आमचा ठाम विरोध असेल. आज राजकारण बाजूला ठेऊन महापुरुषांच्या विचारांना उजाळा देण्याची खरी गरज आहे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
शाह-नड्डांची झाली ‘मॅरेथॉन’ बैठक
महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत समन्वय दिसला. पण निवडणुकीच्या निकालापूर्वीच वादाच्या ठिगण्या नेत्यांमध्ये पडत आहेत. महायुतीत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणातून पदवीधरसाठी उमेदवार दिला, भुजबळ जागांबाबत दावा करत आहेत. त्यामुळे विधानसभेत नेमकं काय होणार? तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार की, ‘एकटा चलो’चा निर्णय घेणार, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.