4 C
New York

Mega Block : मेगा ब्लॉकमुळे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी

Published:

मुंबई

मध्य रेल्वेकडून (Central Railway) आज मध्य रात्रीपासून ठाणे (Thane) स्थानकावर 63 तासाचा विशेष मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. गुरूवारी मध्यरात्री साडे बारापासून सुरू झालेला हा विशेष ब्लॉक रविवार दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र यामुळे अनेक गाड्या, लोकल्स रद्द करण्यात य़ेणार असून कामावर निघालेल्या प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेष मेगा ब्लॉकमुळे अनेक गाड्या, लोकल्स रद्द करण्यात आल्या असून कामावर निघालेल्या प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. आजपासून अनेक गाड्या रद्द झाल्याने लवकरात लवकर लोकल पकडून आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लोकांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली. लोकल ट्रेन्सही दुथडी भरून वाहत असून कल्या, डोंबिवली, ठाणे या स्थानकांवर पाय ठेवायलाही जागा नाहीये. मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

ठाणे ते सीएसटी दरम्यान तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक 10 आणि 11 तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने घेतला हा जम्बो ब्लॉक सुरू आहे. यामुळे लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द करण्यात येणार असून शुक्रवारी 161, शनिवारी 534, तर रविवारी 235 लोकल फेऱ्या रद्द होतील. ऑफीसला जाणाऱ्या लोकलच रद्द झाल्याने प्रवास करायचा कसा असा प्रश्न लोकांच्या मनात असून त्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

या ब्लॉकमुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या काही गाड्या रद्द झाल्या आहेत. अपसाईड वरील स्लो व फास्ट लाईन सुरू आहे. काही प्रमाणात लोकल गाड्या रद्द केल्या असून सुरु असलेल्या लोकल गाड्या पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. डाऊन साईडची फास्ट ट्रॅक वरील लोकल सेवा पूर्णपणे बंद आहे. स्लो ट्रॅक वर लोकल गाड्या उशिराने सुरु असल्याने मुंबई कडून कर्जत व कसाऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

मध्य रेल्वेने मेगाब्लॉकची घोषणा केल्याने अनेक प्रवासी सकाळी घरातून लौकरच बाहेर पडले. मध्येच अडकायला लागू नये, गर्दीचा सामना करावा लागू नये म्हणून अनेक प्रवाशांनी सकाळी लौकरची गाडी पकडण्यास प्राधान्य दिले. मात्र तरीही अनेक गाड्या रद्द झाल्याने, तर काहींना विलंब झाल्याने लोकलमध्ये आणि स्टेशनवर गर्दीचा महापूर दिसत आहे. कुर्ला स्थानकातही अनेक लोकल उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वेच्या या जम्बो मेगाब्लॉकमुळे फक्त लोकल सेवेवरच परिणाम झालेल नाही तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले आहे. मुंबई ते पुणे, नागपूर, अमरावती, कोल्हापूर अशा इंटर सिटी ट्रेनसह लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई- हावडा दुरांतो एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने धावणार असून सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकातुन रात्री एक वाजता सुटणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img