21 C
New York

Marathi Serials: टीआरपीच्या शर्यतीत ‘ही’ मालिका अवव्ल; पहा टॉप १५ मालिका!

Published:

मराठी कलाविश्वात छोट्या पडद्यावरील मालिकांचा (Marathi Serials) चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. संध्याकाळ झाली की, घरोघरी मालिका पहिल्या जातात. मालिकांमुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होत शिवाय मालिकांमध्ये नेहमीच विविध ट्विस्ट आणले जातात त्यामुळे रंगात वाढते. टीआरपीमध्ये सातत्य राखण्यासाठी लोकप्रिय मालिकांमध्ये नेहमीच चढाओढ सुरू असते. गेल्या २ हुन अधिक वर्ष जुई गडकरी आणि अमित भानुशालीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान कायम राखलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीआरपी आकडेवारीनुसार कोणती मालिका कोणत्या स्थानावर आहे जाणून घेऊयात…

मराठी टीआरपी तडका या इन्स्टाग्राम पेजवर दर आठवड्याला मालिकांचा टीआरपी शेअर केला जातो. या यादीनुसार पहिल्या १५ मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांना स्थान मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २ हुन अधिक वर्षांपासून ‘ठरलं तर मग’ मालिका या यादीत अव्वल स्थानी आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका नेहमीच आघाडीवर आहे. त्यानंतर या यादीत चाहत्यांची लाडकी मालिका ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर तिसरं स्थान कोणत्याही मालिकेने नव्हे, तर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरने मिळवलं आहे. तर चौथं स्थान तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ आणि अभिजीत खांडकेकरच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांचा टीआरपीच्या शर्यतीत क्रमांक लागतो.

सनी देओलच्या अडचणीत वाढ; फसवणुकीचा गुन्हा दाखल!


२०१९ मध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यानंतर ही मालिका सातत्याने टॉप १० मध्ये होती. एकेकाळी टीआरपीत अवव्ल स्थानी असलेल्या या मालिकेचा टीआरपी आता घसरला आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत १५ वं स्थान मिळवलं आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिका २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेल्या अनेक वर्ष ही मालिका सातत्याने टॉप १० मध्ये होती. एकेकाळी टीआरपीच्या शर्यतीत प्रथम स्थान असणारी या मालिकेचा टीआरपी आता घसरला आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेने या शर्यतीत १५ वं स्थान मिळवलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img