8.8 C
New York

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांना न्यायालयाचा मोठा दिलासा

Published:

पुणे

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पुणे न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या विरोधात 2013 मध्ये कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आला होता. आज न्यायालयात जरांगे पाटील हजर राहिल्याने शिवाजीनगर कोर्टाने अटक वॉरंट रद्द केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर 2013 साली कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वॉरंट बजावण्यात आलं होतं. त्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले. यावेळी जरांगे पाटील यांनी न्यायालयासमोर सर्व समान आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी न्यायालयात हजर झालोय. याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने 2013 साली एका नाटकाचं आयोजन केलं होतं .या नाटकाच्या प्रयोगानंतर पैसे देण्यात आले नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली होती. या तक्रारीनुसार कलम 156(3) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img