21 C
New York

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचे उद्या मतदान

Published:

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) सातव्या आणि अंतिम टप्प्याचे शनिवारी १ जून रोजी मतदान होत आहे. या टप्प्यात आठ राज्यांतील ५७ जागांवर मतदान होईल. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, आर.के.सिंह, अनुराग ठाकूर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यासह कंगना राणावत (Kangana Ranawat), रवी किशन, पवन सिंह यांचे भवितव्य पेटीबंद होणार आहे. उद्याच्या मतदानानंतर मंगळवारी ४ जून रोजी देशातील सर्व ५५२ जागांची मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा : 169 मतदारसंघात वाढली सत्ताधारी-विरोधकांची ‘धाकधूक’

Loksabha Election : या दिग्गजांचे भवितव्य ठरणार

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा १९ एप्रिलला पार पडला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना देशभरातील ५५२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पूर्ण होत आहे. शेवटच्या टप्प्यात पंजाबमधील सर्व १३, हिमाचल प्रदेशातील सर्व ४, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, ओदिशातील ६, झारखंडमधील ३ तर चंदीगडच्या एका जागेसाठी मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून, उत्तर प्रदेशातील देवरियामधून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंह, पंजाबच्या जालंधरमधून चरणजितसिंग चन्नी, बिहारच्या आरामधून आर. के. सिंह, बिहारच्या पटना साहिबमधून रविशंकर प्रसाद, बिहारच्या पाटलीपुत्र येथून मिसा भारती, प. बंगालच्या डायमंड हार्बर येथून ममता बॅनर्जी यांचे भाचे अभषेक बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img