7.6 C
New York

Mega Block : मेगाब्लॉकचा फटका, वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल

Published:

मध्य रेल्वेची वाहतूक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत येत असते. Mega Block वाढलेली गर्दी, वेळेवर न येणाऱ्या लोकल, गर्दीतील भांडणं किंवा मग विनाकारण एखाद्याचा गेलेला जीव अशा काही कारणांमुळे मध्य रेल्वेबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असतो. अशात आता ३० जूनच्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वे चा महामेगाब्लॉक पुकारण्यात आला आहे. ठाणे स्थानकामध्ये मध्य रात्रीपासून पुढील ६३ तासांसाठी मेगा ब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून सुरु असलेल्या लोकल ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. यासोबतच, लोकल उशिराने असल्यामुळे प्रवाशांना कामावर जायला उशीर होत आहे. म्हणून काही प्रवासी ओला, उबरचा मार्ग अवलंबताना दिसून येत आहेत. यामुळे मुलुंड-ऐरोलीलगत असलेल्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे हाल होताना दिसत आहे. ६३ तासांच्या मेगाब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना वेळेत ऑफिसला पोहोचता येत नाहीये. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांचे पैसे कापले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मार्गावर ३६ तासांचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे तिन्ही मार्गावर परिणाम होणार आहे.

मेगा ब्लॉकमुळे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी

ठाणे ते सीएसटी दरम्यान तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक 10 आणि 11 तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने घेतला हा जम्बो ब्लॉक सुरू आहे. यामुळे लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द करण्यात येणार असून शुक्रवारी 161, शनिवारी 534, तर रविवारी 235 लोकल फेऱ्या रद्द होतील. ऑफीसला जाणाऱ्या लोकलच रद्द झाल्याने प्रवास करायचा कसा असा प्रश्न लोकांच्या मनात असून त्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

या ब्लॉकमुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या काही गाड्या रद्द झाल्या आहेत. अपसाईड वरील स्लो व फास्ट लाईन सुरू आहे. काही प्रमाणात लोकल गाड्या रद्द केल्या असून सुरु असलेल्या लोकल गाड्या पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. डाऊन साईडची फास्ट ट्रॅक वरील लोकल सेवा पूर्णपणे बंद आहे. स्लो ट्रॅक वर लोकल गाड्या उशिराने सुरु असल्याने मुंबई कडून कर्जत व कसाऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेने मेगाब्लॉकची घोषणा केल्याने अनेक प्रवासी सकाळी घरातून लौकरच बाहेर पडले. मध्येच अडकायला लागू नये, गर्दीचा सामना करावा लागू नये म्हणून अनेक प्रवाशांनी सकाळी लौकरची गाडी पकडण्यास प्राधान्य दिले. मात्र तरीही अनेक गाड्या रद्द झाल्याने, तर काहींना विलंब झाल्याने लोकलमध्ये आणि स्टेशनवर गर्दीचा महापूर दिसत आहे. कुर्ला स्थानकातही अनेक लोकल उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वेच्या या जम्बो मेगाब्लॉकमुळे फक्त लोकल सेवेवरच परिणाम झालेल नाही तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले आहे. मुंबई ते पुणे, नागपूर, अमरावती, कोल्हापूर अशा इंटर सिटी ट्रेनसह लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई- हावडा दुरांतो एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने धावणार असून सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकातुन रात्री एक वाजता सुटणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img