लोकसभा निवडणुकीत सहा टप्प्यांतील मतदान झालं आहे. (Loksabha Election) उद्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. त्यानंतर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. राजकीय पक्षांना जशी निकालाची उत्सुकता आहे तशीच जनेतलाही आहे. जोरदार चर्चा सुरू झाल्या की कोण बाजी मारणार याच्या आहेत. अंदाजही लावले जात आहेत. नेते मंडळीही यात मागे नाहीत. आताही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) निवडणुकीत इंडिया आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे. पटोले आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर होते.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. पटोले म्हणाले, राज्यात 40 जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल. तर इंडिया आघाडी देशात तीनशे जागा जिंकणार आहे. निवडणुका सुरू होत्या त्यावेळी आम्ही सांगत होतो की जनतेच्या मनात मोदींबाबत रोष आहे. त्यांनी मतदारांचा अपमान केला आहे, असा आरोप पटोले यांनी केला. यानंतर महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकणार त्यांनी याचा आकडाच सांगून टाकला.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीत सरकार मत मागायलं गेलं त्याच काळात राज्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना काही मदत मिळाली नाही. याबाबत मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे, असे पटोे म्हणाले. शेतकऱ्यांना सरकारपुढे आपले म्हणणे देखील मांडता येत नाही अशी परिस्थिती आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे. दुष्काळ वाढत चालला आहे. राज्यात आजमितीस 75 टक्के भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे टँकर माफिया मात्र घोटाळे करत आहेत. अशी टीका पटोले यांनी केली.
भुजबळांचा मुश्रीफांना टोमणा, म्हणाले
दरम्यान, राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा 25 मे रोजी झाला. आता राज्यातील 48 मतदारसंघात कोण विजयी होणार याचे आडाखे बांधले जात आहेत. यंदा महाविकास आघाडी जास्त जागा जिंकणार अशी चर्चा आहे. महायुतीसाठी वाटचाल कठीण राहिल असे सांगितले जात आहे. खरंच अशी परिस्थिती होणार क याचं उत्तर चार जून रोजीच्या निकालानंतर मिळणार आहे.