23.1 C
New York

Chhagan Bhujbal : भुजबळांचा मुश्रीफांना टोमणा, म्हणाले

Published:

नाशिक

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दोन दिवसांपूर्वी मनुस्मृती (Manusmriti) दहन करतांना अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडले. त्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले. भाजपने (BJP) आव्हाडांवर जोरदार टीका केली. तर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आव्हाडांची पाठराखन केली. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) भुजबळांवर निशाणा साधाला. मुश्रीफांच्या टीकेला आता भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

छगन भुजबळ म्हणाले की, मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल म्हणून आव्हाड यांना पाठिंबा देणे योग्य नाही असे मुश्रीफ म्हणाले होते. मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला आता भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. आपल्या खास शैलीत भुजबळ म्हणाले मुश्रीफ ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांचे ऐकले पाहिजे. या एका वाक्यात त्यांनी हा विषय संपवून टाकला.

छगन भुजबळ म्हणाले की, त्यांना काय शिक्षा करायची ती शिक्षा करा माझं काहीही म्हणणं नाही. पण जे तुम्ही करणारे बोलणारे आहात. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम आहे. मला मान्य आहे ते असलेच पाहिजे. बाळासाहेबांना नको असलेली बहुजन समालाजा नको असलेली मनुस्मृतीचा तुम्ही निषेध करायला पाहिजे. शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करू नये एवढचं माझं म्हणणं आहे. बाकी सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार असं त्यांनी म्हटलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img