21 C
New York

Ladakh : बाईकने लेह-लडाखला जाताय ? मग या टिप्स नक्की लक्षात ठेवा

Published:

Ladakh : काही जणांना ट्रेन,(Train) फ्लाईट, (Flight) नाही तर बाइकनेच प्रवास करायला आवडतो. काहीजण तर दिल्ली ते लडाख (Leh-Ladakh Trip) प्रवास करण्यासाठी सुद्धा बाईकचा प्रवास करतात. जर तुम्हीसुद्धा बाईकने (Bike Trip) लेह-लडाख पर्यंतचा प्रवास करणार असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Ladakh : बऱ्याच जणांच आपल्या बाईकवर प्रेम असत. आणि ज्यांना बाईकने एकटं फिरायला आवडत त्यांचंच लांब जायचं स्वप्नदेखील असतं. आजकाल बऱ्याच लोकांना बाईक चालवण्याची आणि लांब लांब फिरण्याची हौसच भारी असते. पण आपल्यापैकीच काही जणांना बाईक वरून फिरण्याची फार आवड असते. त्यामुळे काही लोक एकटे एकटे जातात तर काहीजण मित्रांसोबत फिरण्यासाठी प्लॅन करतात. एकट फिरणं असूदेत किंवा मित्रांसोबत बाईकने फिरणं असूदेत या पिकनिक ची मजा काही औरच असते. मात्र ही ट्रिप एखाद्या साहसी मोहिमेएवढीच कठीण देखील असते. बरेचसे लोक दिल्लीतून लडाख बाईकने जाण्यासाठी प्लॅन आखतात. तसं बघायला गेलं तर ही ट्रिप आहेच एवढी सुंदर. वाटेत दिसणारी अनेक गावं, सुंदर असं डोंगर. बघत राहण्यासारख्या नद्या आणि बरच काही अगदी नयनरम्य. निसर्गाचा आनंद अगदी जवळून लुटता येतो.

मात्र, सगळाच प्रवास काही सोपा नसतो. ट्रीपमध्ये सुद्धा अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. काही ठिकाणी जास्त फिरल्यास किंवा इतर गाष्टींचा जास्त त्रास होऊ शकतो. यासाठीच तुम्ही सुद्धा बाईकवरून एकटं किंवा मित्रांसोबत लेह-लडाखला जाण्याचा प्लॅन आखत असाल तर निघण्याआधी काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या जाणून व समजून घ्या, ज्या तुमच्यासाठी महत्वाच्या ठरू शकतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहेच पण त्यामुळेच तुमचा बाईकवरचा प्रवास सहज, सुलभ होऊ शकतो. त्यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी काही टिप्स नक्की वाचा आणि फॉलो करा.

रस्त्याबाबतची माहिती नीट असायला हवी

लडाखचं नाही पण कोणत्याही ट्रिपला जाण्याआधी तुम्हाला त्या ट्रिपच्या मार्गबद्धल माहिती असणं महत्वाचं आहे. त्यामुळे पिकनिकला जाण्यापूर्वी रस्त्याबध्दल जाणीवपूर्वक माहितीचा अभ्यास करून जा. प्रवास करताना राहायची सोय, खाण्या-पिण्याची व्यवस्था कुठे आहे याबद्धल संशोधन करा. शक्य असल्यास तुमच्या मित्रांपैकी कोणी लडाख ट्रिप करून आलं असेल तर त्या व्यक्तीकडून माहिती घ्या. ते तुम्हाला अगदी नीट माहिती सांगू शकतील.

http://‘भारतरत्न’ नावाच्या पुढे किंवा मागे वापरता येत नाही! कारण…

शारीरिक काळजी घेतली पाहिजे

लेह-लडाख सारख्या डोंगराळ ठिकाणी बाईकने जाण्यापूर्वी तुमच्या शारीरिक आरोग्याविषयी जाणून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणून तुमच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत आणि महत्वाच्या चाचण्या करून घ्या. प्रवासाला निघण्यापूर्वी आवश्यक असणारी औषधांचा बॉक्स आठवणीने सोबत ठेवा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या असल्यास पहिला तज्ज्ञांचा सल्ला घ्या, मगच पुढे प्रवासाला निघा.

पुरेसे पैसे सोबत ठेवणं गरजेचं

लेह-लडाखला जाताना तुमच्याकडे एक रोख रक्कम असणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे तुम्हाला ऑनलाईन अडचण येऊ शकते त्यामुळे तुमच्याकडे पुरेशी रक्कम ठेवायला विसरू नका. एटीएममधून पैसे काढणं नेहमीच शक्य होईल असं नसत कधी कधी एटीएम पण मिळणं मुश्किल होत. यासाठीच बाईकने प्रवास करताना तुमच्यासोबत पुरेशी रोख रक्कम ठेवा. गरजेवेळेस त्याचा नीट उपयोग करता येईल.

गरजेचं सामान सोबत ठेवायाला विसरू नका

अशा लांबच्या प्रवासाला जाताना तुमच्यासोबत सर्व महत्वाच्या वस्तू असायला हव्या. लवकर खराब न होणारे अन्नपदार्थ आणि कधीपण खाऊ शकाल असेच पदार्थ सोबत ठेवा. सहसा सुखा खाऊ किंवा पाणी जास्त प्या तुमच्या आणि आरोग्यासाठी फायद्याचं ठरेल. बाईकवरून प्रवास करण्यासाठी एक चांगल्या दर्जाचं आणि सेफ्टी गियर घालणं आवश्यक आहे. तसंच बाइकमध्ये पेट्रोल पूर्ण भरून निघा. बाईकच्या पेट्रोल काट्यावर वारंवार लक्ष ठेवा. आणि पुढील पेट्रोल पंप केवढ्या अंतरावर आहे याचीही माहिती नीट ठेवा.


ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img