3.1 C
New York

Arjun Kapoor: अर्जुन-मलायकाचं ब्रेकअप? ५ वर्षांच्या डेटिंगनंतर घेतला निर्णय!

Published:

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायमच चर्चेत असतात. बॉलिवूडमधील सर्वात कपल म्हणणं देखील त्यांना ओळखलं जातं. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची झलक देतात. त्यांच्या वयात तब्ब्ल १२ वर्षांचे अंतर असूनही गेले ५ वर्ष ते एकत्र आहेत. मात्र सध्या त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, अर्जुन आणि मलायकाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘मलायका आणि अर्जुनचे खास नाते कायम राहील. दोघेही एकमेकांच्या हृदयात एक विशेष स्थान कायम ठेवतील. त्यांनी जरी वेगळे होण्याचे निवडले असले तरी या प्रकरणी त्यांना भाष्य करायचे नाही. तसेच कोणीही आमच्या नात्यात ढवळा-ढवळ करू नये.’ २०१८ पासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुन आणि मलायका एका फॅशन शोमध्ये एकत्र दिसल्यावर चर्चा रंगल्या होत्या. मलायकाच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा देखील केली. अर्जुन ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये त्याने त्याच्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या नात्याविषयी भाष्य केले होते.

सनी देओलच्या अडचणीत वाढ; फसवणुकीचा गुन्हा दाखल!

दरम्यान, अर्जुनच्या कामाबद्दल सांगायचं तर, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’मध्ये अर्जुन झळकणार आहे. या चित्रपटात तो विरोधी भूमिकेत दिसणार आहे. तर अनीस बज्मी दिग्दर्शित ‘नो एंट्री 2’मध्ये अभिनेता अर्जुन महत्वाच्या भूमिकेतून दिसणार आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्याही भूमिका आहेत. दुसरीकडे, मलायका अनेक ब्रँड एंडोर्समेंटमध्ये व्यस्त आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img