9.5 C
New York

Amazon: कर्जबाजारी अँपची ॲमेझॉनने केली खरेदी!

Published:

अनेक सुपरहिट वेब सीरिजचे स्ट्रिमिंग करणार ओटीटी प्लॅटफॉर्म जगभर प्रसिद्ध कंपनी ॲमेझॉन (Amazon) खरेदी करणार आहे. गेल्या वर्षापासून या ओटीटी प्लॅटफॉर्मची विक्री होणार असल्याची चर्चा रंगली होती. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. एमएक्स प्लेअर (MX Player) हा ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन खरेदी करणार आहे. एमएक्स प्लेअर हा ओटीटी प्लॅटफॉर्म टाइम्स इंटरनेट (Time Internet) कंपनीच्या मालकीचा असून लवकरच ॲमेझॉन खरेदी करणार आहे.

‘मिंट’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, एक वर्षापूर्वी टाइम्स इंटरनेट आणि ॲमेझॉन प्राईममध्ये अँपच्या विक्रीची चर्चा सुरू होती. मात्र, दोन्ही कंपन्यांमध्ये डीलची चर्चा मध्येच थांबवण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांमध्ये परस्पर सहमती तयार न झाल्याने चर्चा थांबवण्यात आली. वर्षांपूर्वी 830 कोटींची टाइम्स इंटरनेटने एमएक्स प्लेअरसाठी मागणी केली होती. तर, 500 कोटींमध्ये ॲमेझॉनने करार करण्याची तयारी दर्शवली होती. एमएक्स प्लेअरची अवस्था आणखी बिकट झाली. वाढत्या कर्जामुळे एमएक्स प्लेअरचे मूल्य एक वर्षाच्या आधीपेक्षाही कमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, एमएक्स प्लेअर हे 2500 कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे.

‘All Eyes on Rafah’च्या ट्रेंडमुळे सिनेसृष्टीत खळबळ! नेटकऱ्यांचा इशारा…

मात्र आता दोन्ही कंपन्यांमध्ये डील पक्की झाली आहे. पंरतु, एमएक्स प्लेअरचे कर्ज आपल्या माथी घेणार नसल्याचे ॲमेझॉन ने स्पष्ट केले आहे. टाइम्स इंटरनेटच एमएक्स प्लेअरवरील कर्जाची परतफेड करणार आहे. या डीलनंतर एमएक्स प्लेअरचे सीनियर मॅनेजमेंट ॲमेझॉन मध्ये सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.

एका वृत्तानुसार, टाइम्स इंटरनेट गेल्या काही काळापासून आपल्या संपत्तीची विक्री करत आहे. गेल्या वर्षी टाइम्स इंटरनेटने MX Takatak, Dineout, MensXP, iDiva and Hypp या अँपची विक्री केली. ॲमेझॉनने 100 दशलक्ष डॉलरहून अधिक रुपयांमध्ये ही डील करण्यात आली आहे. २०११ मध्ये एका दक्षिण कोरियाई कंपनीने मीडिया प्लेअर अँप म्हणून एमएक्स प्लेअरला लाँच केले होते. त्यानंतर टाइम्स इंटरनेटने वर्ष 2018 मध्ये 1000 कोटींनी या अँपची खरेदी केली. या प्लॅटफॉर्मला टाइम्स इंटरनेटने ad-supported streaming service साठी पु्न्हा लाँच केले. एमएक्स प्लेअरने आपल्याकडे 300 दशलक्षहून अधिक युजर्स असल्याचा दावा केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img