सध्या सोशल मीडियावर एका पोस्टमुळे खळबळ माजवली आहे. अगदी सामान्य माणसापासून ते कलाकार मंडळींपर्यंत या पोस्टने वातावरण पालटलं आहे. ‘All Eyes on Rafah’ (ऑल आईज ऑन रफाह) अशा नावाचं एक टेम्प्लेट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही पोस्ट बॉलीवूडच्याही अनेक कलाकारांनी शेअर केली आहे. त्यामुळे बॉलीवूडसह मराठी कलाकारांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय.
पण ‘ऑल आईज ऑन रफाह’ हे नेमकं आहे तरी काय?
तर या प्रकरणाचा संबंध हा इस्राईल आणि पॅलेस्टाईन यु्द्धाशी आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोन देशात संघर्ष सुरु आहे. त्यातच गाझाच्या दक्षिण भागीतील रफा शहारावर इस्रायलने हल्ला केला. त्यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच गाजतंय. अगदी माधुरी दिक्षितपासून ते मराठी कलाकारांनी देखील ही पोस्ट शेअर केली. मात्र नेटकऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे.
कलाकारांच्या भूमिकांवर विरोध
वरुण धवन, माधुरी दिक्षित, करीना कपूर खान, आलिया भट्ट, तृप्ती डिमरी, समांथा प्रभू, फातिमा सना शेख आणि स्वरा भास्कर यांसह अनेक कलाकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील या पोस्ट शेअर केल्या आहेत. पण काही कलाकारांनी या ट्रेंडचा जाहीर निषेधही व्यक्त केलाय.
सनी देओलच्या अडचणीत वाढ; फसवणुकीचा गुन्हा दाखल!
अभिनेता सौरभ गौखलेने यावर विरोध दर्शवला आहे. त्याचसंदर्भात एक पोस्ट शेअर केली. त्याने म्हटलं की, ‘स्वत:च्या घरी कामाला येणाऱ्या बाईंचं पोर शाळेत जाऊ शकतं कि नाही हे आम्हाला माहित नाही, पण आमचं स्टेटस ‘All Eyes on Rafah’. दरम्यान कलाकारांच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा बॉलीवूड बायकोट असाही ट्रेंड सुरु झालाय.
इस्रायलने रफा शहरावर केलेल्या या हल्ल्यात जवळपास 45 पॅलिस्टिनी लोकांचा खात्मा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध सुरु झाल्यानंतर स्वत:च्या बचावासाठी पॅलिस्टॅनी लोकं रफामधील एका ठिकाणी स्थलांतरिचा झालीत. त्यांच्यावरच हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मात्र कलाकारांच्या समर्थनामुळे नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग सामना करावा लगत आहे.
कलाकारांची ही भूमिका एकतर्फी असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच भारताशी या प्रकरणाचा संबंध जोडत काश्मीरी पंडिताचा उल्लेख नेटकऱ्यांकडून करण्यात येतोय. काश्मीरमध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांविरोधात हिंसा सुरु होती, तेव्हा ही कलाकार मंडळी कुठे होती, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी केलाय. त्याचप्रमाणे कलाकारांनी कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी त्याची कल्पना असावी असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.