19.4 C
New York

Air India : एअर इंडियाच्या विमानात एसी बंद; प्रवासी पडले बेशुद्ध

Published:

एअर इंडियाच्या (Air India) विमानाकडून पुन्हा एकदा प्रताप घडला आहे. प्रवासी बसल्यानंतर एअर इंडियाचे विमान आठ तास लेट झाले. त्यानंतर विमानातील वातानुकुलीत यंत्रणा (एसी) बंद होते. यामुळे विमानात प्रवासी बेशुद्ध पडले. त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर सर्वांना बाहेर काढण्यात आले. विमानात घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कंपनीकडून या प्रकारबद्दल माफी मागण्यात आली आहे.आता सॅन फ्रन्सिस्कोला 20 तासांच्या उशिरानंतर हे विमान आजरवाना होणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेक प्रवाशांनी एअर इंडियाला टॅग करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. श्वेता पुंज नावाच्या प्रवाशाने शुक्रवारी (31 मे) तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, आम्हाला रात्री उशिरा हॉटेलमध्ये हलवण्यात आले आणि आज सकाळी 8 वाजता विमानतळावर पोहोचण्याची सूचना देण्यात आली.

Air India कंपनीने दिले तांत्रिक कारण

एअर इंडिया कंपनीच्या विमानाचे दिल्ली विमानतळावरून ( फ्लाईट AI 183) उड्डाण दुपारी 3:20 वाजता गुरुवारी होणार होते. एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण परंतु आठ तास झाले नाही. कंपनीकडून तांत्रिक कारणामुळे उड्डाण झाले नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले. अनेक प्रवासी त्याचवेळी विमानातील एसी बंद असल्याने बेशुद्ध झाले. यासंदर्भात अनेकांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली.

बाईकने लेह-लडाखला जाताय ? मग या टिप्स नक्की लक्षात ठेवा

Air India एअर इंडियाने मागितली माफी

एअर इंडियाने X वर म्हटले आहे की, एअर इंडियाच्या प्रवाश्यांना झालेल्या असुविधेमुळे आम्ही माफी मागतो. आमची टीम काम करत आहे. लवकरच विमानाचे उड्डाण होणार आहे. प्रवाश्यांची मदत करण्यासाठी आम्ही टीमला सतर्क केले आहे.जानेवारी महिन्यात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. DGCA ने बोर्डिंग नाकारणे, उड्डाणे रद्द करणे आणि उड्डाणांना होणारा विलंब यामुळे एअरलाइन्सद्वारे प्रवाशांना सुविधा पुरविल्या जाव्यात” असे म्हटले होते. सर्व विमान कंपन्यांनी त्वरित SOP चे पालन केले पाहिजे, असे म्हटले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img