21.1 C
New York

Latur Lok Sabha : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात कुणाची हवा?

Published:

राजकीय दृष्ट्या सुपीक असलेल्या लातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मात्र कायम असते. रेल्वेने मराठवाड्यात पाणी आणलं ही चर्चा होती ती या जिल्ह्यातीलच. (Marathwada) या जिल्ह्यासाठी रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं. (Latur Lok Sabha) याच जिल्ह्याचे विलासराव देशमुख 8 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर या जिल्ह्यातील शिवराज पाटील चाकूरकरही केंद्रात सातत्यानं महत्वाची जबाबदारी सांभाळत होते. (Lok Sabha) मात्र, याच लातुरच्या मतदारांनी दोन माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्यांना निवडणुकीत पराभवाचं पाणी पाजलंय. दरम्यान, दहा वर्षांपासून या जिल्ह्यात भाजपाचं वर्चस्व आहे.

Latur Lok Sabha लातूरला कोण बाजी मारतो हे पाहावं लागणार

डॉ. सुनील गायकवाड 2014 साली आणि सुधाकर श्रृगांरे 2019 साली हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. यंदाच्या लोकसभेत भाजपकडून पुन्हा एकदा श्रृंगारे भाजपाचे उमेदवार होते. तर, काँग्रेसकडून अमित देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जाणारे डॉ. शिवाजीराव काळगे रिंगणात होते. या निवडणुकीत लातूर जिल्ह्यात जोरदार जोरदार चर्चा होती ती देशमुख कुटुंबाची. विलासराव देशमुख यांच्या दोन आमदार चिरंजीवांनी या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे लातूरला कोण बाजी मारतो हे पाहावं लागणार आहे. मतदारसंघाच्या फेररचनेत 2008 साली लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाला. या मतदारसंघात लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा हे लातूर जिल्ह्यातील पाच आणि लोहा या नांदेड जिल्ह्यातल्या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तसंच, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसची शक्ती ही लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघापुरती मर्यादीत झाली अससल्याचं दिसंत. अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे विलासरावांचे दोन मुलं इथून आमदार आहेत.

नाथाभाऊंच्या एन्ट्रीनं निवडणूक फिरली?

Latur Lok Sabha लातूर लोकसभा मतदारसंघात पाणी प्रश्न

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा 2 लाख 89 हजार 111 मतांनी पराभव केला होता. मागील लोकसभा निवडणुकीत 62.44 टक्के मतदान झालं होतं. यंदा यामध्ये जास्त वाढ झाली नाही. थोडी वाढ होऊन 62.59 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे या मतदानाच्या टक्केवारीचा कुणाला फायदा होतो हे पाहणं महत्वाचं आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात पाणी प्रश्न, बेरोजगारी, रेल्वे कोच कारखाना, शेतमालाला भाव, सिंचन व्यवस्था, रस्ते हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. काँग्रेसनं लिंगायत समाजाचा विचार करत शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिल्यानं या निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. तसंच, संपूर्ण देशमुख कुटुंब काळगे यांच्या प्रचारासाठी उतरलं होतं. त्यामुळे काळगे यांचा विजय हा देशमुख घराण्यासाठी प्रतिष्ठेचा मानला जात आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या प्रचारसभा झाल्या आहेत. पण, या दोन्ही नेत्यांनी स्थानिक मुद्यांवर फोकस न करता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. हा मुद्दा देखील मतदारांमध्ये चर्चेचा ठरला. यापूर्वी दिग्गज नेत्यांना पराभवाचं आस्मान दाखवणारे लातूरकर मतदार या निवडणुकीत काय निर्णय घेतात हे चार तारखेलाच स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img